पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

} ९२ {शः १७८३ मार्च २४ ४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ३३ गुंडभट महादेव संशो. क्र. १ सु. ११८३ जाार २० | श. १७०५ वैशाख वद्य ५ स. १७८३ मार्च २४ मु. सलास समानीन मया व अलफ छ २० जमादिलावल वेदमूर्ती गुंडभट बिन महादेवभट उपनाम पेंडसे गोत्र जामदग्नि सूत्र आश्वलायन वास्तव्य क्षेत्र नरसीपुर यांनीं हुजूर कसबे पुणे मुक्कामी येऊन विदीत केली की आपले सासरे धोंडभट परांजपे यांस पोर इंदापूर येथे वर्षासन १०० रुपये सरकारांतून पावत होते त्यास भटजीचा वृद्धापकाळ पोटीं पुत्रसंतान नाहीं आपण भटजीचे जावई यास्तव सदरहू वर्षासनाचे दानपत्र त्यांनी आमचे नांवे क्षेत्रीं लिहून दिलें उपरांती भटजीचा काळ झाल्यावर भटजीचे पत्राप्रमाणे वर्षासनाचा ऐवज कााादार यांनी आपणास द्यावा त्यास सरकार सनदेचा आक्षेप करितात याजकरितां स्वामींनी कृपाळु होऊन आमचे सासरे यांनी पत्र करून दिले आहे ते पाहून त्याप्रमाणे आमचे नांवे वर्षासन सरकारातून करार करून देऊन भोगवट्यास सनद करून दिली पाहिजे म्हणोन त्याजवरून मनास आणतां धोंडभट परांजपे यांस वर्षासन १०० रुपये पा मजकूरपैकीं पावत होते त्यास ते मृत्य पावले त्याचे पोटीं पुत्र नाहीं याजकरितां त्यांनी आपले जावई गुंडभट यास वर्षासनाचे दानपत्र करून दिले ते पाहून हे थोर शिष्ट सत्पात्र याचे चालविल्यास श्रेयस्कर जाणोन याजवर कृपाळु होऊन सदरहू १०० रुपये वर्षासन पो। सालमजकुरापासून सरकारांतून पाा मजकुरी वर्षासन रुपये ५० करार करून देऊन हे सनद सादर केली असे तरी सदरहूप्रमाणे ५० रुपये वर्षासन भटजीस पो मजकूरपैकी सालदरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा आक्षेप न करणे या सनदेची प्रती लिहून घेऊन हे असल सनद भटजीजवळ भोगवट्यास परतोन देणे. ३ प. कु. वृ.