पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३), प्रत्येक कुलाच्या उत्कर्षापकर्षाचा परिणाम एकंदर ब्राह्मणसमाजावर होत असल्याने ब्राह्मणसमाजाच्या भवितव्याविषयी विचार करण्यालाहि कुलवृत्तान्ताचाच आधार घ्यावा लागतो. यास्तव कुलवृत्तान्त माहितीपूर्ण व बिनचूक तयार करणे अगत्याचे आहे. पेंडसे कुलवृत्तान्त प्रथम १९३८ सालीच तयार होऊन प्रसिद्ध झाला. सध्यांचा हा भाग पहिल्या भागाला पुरवणीसारखा जोडला जात आहे, पण त्याबरोबरच पूर्वीच्या भागांत जी माहिती अपूर्ण अथवा संशयास्पद होती ती आतां पूर्ण व संशयातीत स्वरूपांत यांत देण्यात आली आहे. वास्तविक पाहतां २५ वर्षांनी जुनी पिढी जाऊन नवी पिढी पुढे येत असल्याने कोणत्याहि कुलवृत्तान्ताची दुसरी आवृत्ति अथवा पुरवणी २५ वर्षांचे आंत काढण्याचे कारण नाही. परंतु अद्यापि आपल्याकडे कुलाची माहिती देणे व ती तपशीलवार देणे याचे महत्त्वच पुरते पटलेले दिसत नाहीं; त्यामळे पहिल्या खेपेस मिळालेली माहिती अपुरी राहिल्याने दहा वर्षातच पुरवणी छापण्याची पाळी आली आहे. छोट्या कुळांचे वृत्तान्त गटवारीने प्रसिद्ध करावे कुलवृत्तान्त छापून काढण्याची कल्पना योजून ते कार्य करून दाखविण्याचा पहिला मान कै. गोविंदराव आपटे यांना आहे. त्यानंतर या कामाची पद्धतशीर मांडणी करणे, माहिती मिळवून तिच्या प्रसिद्धीची तयारी करून देणे इत्यादि कामें करण्यांत श्री. विष्णु विनायक परांजपेशास्त्री आणि चिंतामणशास्त्री दातार यांनी मोठीच प्रगति केली आहे. त्याचप्रमाणे पेंडसे कुलवृत्तान्ताचे लेखक श्री. कृ. वि. पेंडसे यांनी कुलवृत्तान्त-संघ स्थापन करून आणि पेशवे दप्तरांतील कागदपत्र पाहावयास मिळण्याची परवानगी मिळवून भावी कुलवृत्तान्तकारांची मोठो सोय करून ठेवली आहे. यामुळे दहावीस तरी नवे कुलवृत्तान्त गर्भावस्थेत आहेत. आतांपर्यंत प्रसिद्ध झालेल्या कुलवृत्तान्तांत परांजपे, पेंडसे, लिमये, भावे, खरे, साठे, मराठे इत्यादि घराण्यांचे वृत्तान्त नमुनेदार झाले आहेत. कुलवृत्तान्तांत नमूद करावयाच्या विद्यमान कुलबंधूंची संख्या किमानपक्ष एक हजार असेल तर प्रकाशनाचे काम देणग्यांच्या व विक्रीच्या रकमेतून भागते. ज्या घराण्यांतील विद्यमान पुरुष व्यक्तींची संख्या शेंपांचशेच्या आंतच असेल त्या घराण्यांचा वृत्तान्त कोणातरी धनाढ्य व्यक्तीने अंगावर घेऊन तयार केला तरच तो होऊ शकतो. पण इच्छातर अशी आहे की, कूल लहान असो वा मोठे असो प्रत्येक कुलाचा वृत्तान्त छापला - जाऊन समाजाच्या इतिहासाचे हे एक अंग तरी पूर्णतया इतिहासलेखकास उपलब्ध व्हावे. ही इच्छा सफल होण्याकरितां लहान लहान घराण्यांनीं गोत्रवारीने गट करून कुलवृत्तान्ताच्या ऐवजी गोत्रवृत्तान्त प्रसिद्ध करण्याची प्रथा सुरू करावी, वृत्तान्ताच्या एका खंडांत निदान दोन हजार विद्यमान पुरुष व्यक्तींचा समावेश