पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) बळकट होतात, आणि बौद्धिक श्रमानेंहि बुद्धि न थकतां उलट अधिक तीक्ष्ण होते. तेव्हां कुलवृत्तान्त--लेखनाच्या कार्याने नुकसान न होतां अत्यल्प का होईना पण फायदाच होत असला पाहिजे. तर्कटी आक्षेपांना उत्तर स्वतःच्या मनालाच यांत कांहीं तरी रुखरुख वाटते आहे म्हणून हे ओढूनताणून आत्मसमर्थन चालू आहे असा याचा अर्थ नव्हे. आम्हा स्वतःस हैं। एक अवश्य कर्तव्यच वाटते याविषयी शंकाच नाही व तेवढ्याकरितांच चित्तपावन परिषदेत असे कुलवृत्तान्त प्रसिद्ध केले जावेत म्हणून ठरावहि संमत करून घेण्यांत आला. पण हल्लींच्या कालांत साध्या गोष्टीवरहि आक्षेप घेण्यांत आणि भ्रान्तिष्टपणाने साप साप म्हणून भुई बडविण्यांत येत असल्याने, आक्षेपकांनाहि निरुत्तर व्हावे लागेल अशी अगदी खालच्या थराची भूमिका पत्करणेच सोयिस्कर वाटून ‘बैठेसो बेगार अच्छा' या न्यायानेच हे काम करण्यांत येत आहे असे म्हणून आक्षेपांची नांगी मोडून टाकण्यात येत आहे. कल्पित आक्षेपांना फाजील विनयाचे हे उत्तर देण्यात येत आहे. असे कोणी मानण्याचे कारण नाहीं. जर्मन महायुद्ध चालू असतांना देशांत कोठे कांहीं खुट्ट झालें कीं, ती जर्मनांची कारवाई असावी असा अंदेशा घेण्यात येत असे, त्याप्रमाणे हल्ली कोठे कांहीं बिनसलें कीं, ब्राह्मण समाजाच्या बोचक वरचढपणाचा हा परिणाम होय असा सिद्धान्त ठोकून दिला जातो. याच विचारसरणीला अनुसरून एका शहाण्या लेखकाने असे विधान ठोकून दिलें कीं, ब्राह्मण समाज इतराना हलकट समजतो, याचा पुरावा पाहावयाचा असल्यास त्यांचे कुलवृत्तान्तांचे प्रकाशन पाहा. कुलवृत्तान्त प्रसिद्ध करणे म्हणजे आपल्या हाताने आपल्या भोंवतीं दिव ओवाळून घेऊन स्वतःच्या मोठेपणाचा टेंभा मिरवणेच होय. असल्याच प्रकाराना ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यांतली दुही वाढत जाते ! असले तर्कटी आक्षेप दृष्टीसमोर आल्यावर स्वतःची भूमिका पारखून तो शुद्ध व निर्दोष असल्याबद्दल पुनः एकदा मनाची खात्री करून घेणे अगत्याचे होत. त्याकरितां वरील ऊहापोह केला आणि आत्मनिरीक्षण केल्यावरून अशी खात्री पटली की, हे कार्य नुसते निर्दोष आहे एवढेच नव्हे तर या योगाने समाजालाहिं आत्मनिरीक्षणाचे हितकर वळण लागेल. व्यक्तीने वा संघाने वारंवार आपल्या जमाखर्चाचा ताळेबंद पाहण्यांत ज्याप्रमाणे दूरदर्शीपणा दिसतो त्याप्रमाणेच एकेक पिढीच्या अंतरानें कुलवृत्तान्त पाहण्यांत दूरदृष्टीच व्यक्त होते. आपल्या कुलाचा उत्कर्ष होत आहे का अपकर्ष होत आहे हे समजून येण्याला हा आढावाच साधनीभूत होणार असून कुलाचा अपकर्ष होत असल्यास तो टाळण्याला कोणता उपाय योजावा याची चिकित्सा करण्याला असले कुलवृत्तान्त हाच मूलाधार हयिः