पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे | ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख २७: १५ का ३ पे. द. रु. ११२ सु. ११७८ सफर २६ श. १६९९ फाल्गुन व. १३ गुरु. बाबुराव राम (२०-५) । ( इ. १७७८ मार्च २६ बाबुराव राम पेंडसे याणी कोठे फंदफितूर करू नये आपले गांवों कोंकणांत जाऊन राहावे याप्रमाणे करार करून मशारनिल्हे बरोबर सरकारची माणसे देऊन तुम्हांकडे पाठविले आहेत. याजपासून हजीर जामीन चांगला घेऊन जामीन कतवा तेथे ठेऊन जामीन कोण घेतला तो हुजूर लिहून पाठविणे ते आपलें गांवीं खोतीचे वतनावर मौजे वणोशी तर्फ पंचनदी ता. सुवर्णदुर्ग येथे राहतील त्यास मशारनिल्हेचे वतनाचा भोगवटा सन सीत सीतैनापावेतों चालला. अलिकडे याचे तीर्थरूप शांत झाले हे रोजगारामुळे देशांत होते. सबब भोगवटा चालला नाही म्हणून हुजूर विदीत केले त्यास सुदामतप्रमाणे भोगवटा चालत आला असेल तो मनास आणून वाजवी असेल त्याप्रो मौजे मजकूरचे खोतीचे कामकाज याचे हाते घेत जाणे मारनिले गांवी राहतील तेव्हां कर्जदार यास येऊन तगादा करतील तरी तगादा तूर्त करू न देणे. पुढे सोई सोईने पैक्याचाहि निकाल करतील. म्हणोन ताकीद करणे म्हणोन मोरो बापूजी तालुके मजकूर यांचे नांवे छ २३ जिल्हेज सनद १ पे. द. जमाव रु. ४८१ ( सु. १२११ सवाल २० श. १७३२ कातिक व. ७ मोरो बाबूराव (२०-६) ( इ. १८१० नोव्हेंवर १८ अजस्वारी राजश्री सदाशिव माणकेश्वर सुभेदार प्रांत जंजीरे सुवर्णदुर्ग तो रयान मौजे वणोसी ताा पंचनदी साा इहिदे अशर मयातैन व अलफ मौजे मजकूर येथील वतनदार खोत परागंदा आहे. काही दिवस कमाविस धोंडजोशी पंचनदीकर करीत होते. अलीकडे पेंडसे फडके यांचे कारकिर्दीपासून चालवितात त्याची जप्ती करून मौजे मजकूरची वहिवाट सरकारात ठेविली पाहिजे म्हणोन पुण्याच्या मुकामी विदीत झाले त्यावरून मौजे मजकूरची जप्ती करून जप्तीचे काम........याजकडे सांगोन तुम्हांस आज्ञा केली असे. मशारनिल्हे जप्तीची वहिवाट करून सरकार दस्ताची उगवणी करून सरकारांत जमा करतील तुम्ही यांचे रजातलबेत वतन कीर्द महामुरा करीत जाणे जाणीजे छ २० सवाल. पे. द. रो. रु. ६४९ बहिरंभट चार भट गोविंद सु. ११३८ जमादिलावल २४ श. १६५९ भाद्रपद व. ११ इ. १७३७ सप्टेबर ९