पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कछन्ताङका कुलवृत्तान्ताचें साफल्य कशांत आहे ? . चित्तपावन ब्राह्मण वर्गात कुलवृत्तान्त लिहून प्रसिद्ध करण्याची प्रथा सध्या जोरात सुरू आहे. कुलाभिमान, ऐतिहासिक संशोधनाची आवड आणि एक प्रकारच्या संघटित कार्याची प्रेरणा या दृष्टीने ही प्रथा अभिनंदनीय आहे. त्याच बरोबर तात्त्विक दृष्टया असा एक खिन्नतेचा विचार मनास चाटून जातो; आतां चित्तपावन ज्ञातीपुढे भविष्यकाळांत कोणतेहि भव्य उच्च ध्येय उभे नाही म्हणन तर ही मंडळी जुन्या संशोधनांतून हाती लागणा-या पूर्वजांच्या भूतकालीन पराक्रमाकडे पाहूनच समाधान मानून घेण्याच्या वृत्तीने भारलेली नसतील ना ? अशी शंका येण्याचे कारण हेच की, ज्यावेळी एखाद्या समाजांत अथवा राष्ट्रांत नित्य नवे नवे रोमांचकारी प्रसंग घडून येत असतात त्या वेळी व्यक्तींची वे समाजाची दृष्टि वर्तमान व भविष्यकाळांनी आकर्पून घेतल्यामुळे भूतकाळाची चिकित्सा करीत बसण्याला मनाला फुरसत नसते व त्या चिकित्सेत त्याचे मन रंगूनहि जात नाहीं. हे तत्त्व खरें मानल्यास आज मितीला चित्तपावन समाजापुढे चित्तवेधक असे भविष्यकालीन चित्र उभे नसल्यामुळेच हा समाज भूतकालीन ज. स. करंदीकर घडामोडींच्या संशोधनांत आपल्या मनाला विरंगुळा प्राप्त करून देण्याच्या नादी लागला असावा, ही शंका साधार ठरेल. ते कसे हि असो. चित्तपावनसमाज आपला आजपर्यंतचा इतिहास शोधण्याच्या कामांत लक्ष घालू लागला यांत दोषास्पद असे कांहीं नसून तो उद्योग कांहींच न करीत काळ कंठण्यापेक्षां बरा एवढे तरी हमखास म्हणता येईल. आपल्यांत ' बैठेसो बिगार अच्छा' अशी एक म्हण आहे. तिच्यांतला मतलब तरी हाच कीं, रिकामें बसून सैतानाला मनांत धुडगुस घार याला अवसर देण्यापेक्षां फुकटाची बिगार का होईना, पण त्या कामांत गुंतून राहिलेले बरे. त्याचप्रमाणे दुसराहि एक अनुभवसिद्ध सिद्धान्त आहे कीं, काम केल्याने कांहीं हात झिजत नाहीत, तर उलट्ट