पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेंडसे—कुलवृत्तान्त އގދތރގއގތރކޅގތރވއގހރރރރތކރމނދވތދވއތނގއލވއދއފލ.ގއގއތކއތރވ. ।। ७. पेशवेदप्तर जमाव रुमाल ४९० व ४९१ मध्ये वाडा सडिये मौजे पुसाळे तर्फ नेवरे येथील बोट खतांत ‘ठिकाण पेंडसा कर्दे रामदेमानी भिडे खोत व ‘सखंभट लक्ष्मण पेंडसे याचे ठिकाण नेने यांजकडे होते' अशी || माहिती आहे. वरील १ ते ७ मधील गांवे रत्नागिरी पंचक्रोशीत आहेत. चित्पावन या पुस्तकांत चित्पावनांचे कोंकणांतले मूळ गांव वा स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न 'ग्रंथकर्त्याने केला आहे. या संबंधींचे संशोधन मुख्यतः “कुलस्वामी', वर आधारलेले आहे. घराण्याचा कुलस्वामी जेथे असेल ते त्या घराण्याचे मूलस्थान होय अने अनुमान काढले आहे व गुहागर हे सर्व चित्पावनांचे मूलस्थान असावे असे अनुमान केले आहे. गुहागरास वाडेश्वर हा देव आहे व कांहीं चित्पावन वाडेश्वर कुलस्वामी मानतात. तो सर्व चित्पावनांचा कुलस्वामी आहे अथवा होता असे दाखवितां आल्यास गुहागर हे त्यांचे कोंकणांतील मूळ वास्तव्याचे ठिकाण ठरवितां येईल. हा हेतु मनांत धरून त्या पुस्तकांत सर्व संशोधन झाले आहे व चित्पावनांच्या कुलस्वामींची त्यांत तपासणी केली आहे. पेंडसे यांचा कुलस्वामी वाडेश्वर असावा व ते गुहागरचे असावे असे इतर अनेक उपनावाप्रमाणे ओढून ताणून दाखविण्याचा यत्न केला आहे. इतर उपनांवांबद्दल येथे चर्चा करणे अप्रस्तुत आहे. परंतु, पेंडशांचे बाबतीत तो प्रयत्न यशस्वी झाला नाही असे स्पष्टपणे म्हणजे सप्रमाण म्हणणे भाग आहे. पेंडसे मुळ गुहागरचे नसून रत्नागिरी पंचक्रोशीतील आहेत व त्यांचे परिभ्रमण मुख्यत: दक्षिणेकडून उत्तरेकडे झाले आहे. धामापुरच्या पेंडशांचा कुलस्वामी वाडेश्वर आहे अशी चुकीची माहिती ग्रंथकत्यस मिळाली व त्यावर त्यांनी त्यांचे अनुमान केले आहे. धामापुरचे घराणे मूळ गोळपचे असून त्याचा कुलस्वामी लक्ष्मीकेशव आहे, वाडेश्वर नव्हे. कांहीं पेंडसे घराणी आदित्यनाथ कुलस्वामी मानतात. आदित्यनाथाचीं देवालये रत्नागिरी पंचक्रोशीत नेवरे, आंबव, आगरगुळे इत्यादि ठिकाणीं आहेत. आदित्यनाथाचे देऊळ गुहागरास नाहीं. ही गोष्टही पेंडसे मूळ रत्नागिरी जवळील आहेत हेच सिद्ध करते. || .


। |