पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें] भृगुकुलोत्पन्न पेंडसे ७ -- -- --- - नियम धर्मसूत्रे या नांवाच्या ग्रंथप्रकारांत एकत्रित केलेले आहेत. या तिन्ही प्रकारच्या सूत्रग्रंथांना कल्प अशी सामुदायिक संज्ञा आहे. आपल्या आश्वलायन सूत्रांचे आश्वलायन श्रौतसूत्र व आश्वलायन गृह्यसूत्र असे दोन भाग आहेत. (आश्वलायनाचे धर्मसूत्र उपलब्ध नाहीं). या सूत्रानुसार आपलीं श्रौत व गृह्य कृत्ये केली जातात. या विवेचनावरून आपण ऋग्वेदाच्या शाकलशाखेनें अध्ययन वारणारे व आश्वलायन सूत्र मानणारे असे म्हणण्याचे महत्त्व काय व ते कसे प्रचारांत आले याची थोडीशी तरी कल्पना येईल. १ . । प्रकरण ३ रे मूलस्थान प्रथम खंडांत तीस घराण्यातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीवरून व इतर अनुमानावरून पेंडसे यांची वसती जात अशा पूर्वकाली रत्नागिरीचे पंचक्रोशीत म्हणजे-- नेवरे, गोळप, सोमेश्वर, सडे- पिरंदवणे, टोळवाडी व कासारवेली येथे-- होती असे आम्ही दाखविले आहे. त्यानंतर खाली दिलेली माहिती उपलब्ध झालीः त्यावरून आमचे म्हणण्यास पुष्टि मिळाली आहे. १. घराणे ३१ वे याचे मूळ गांव गोळप आहे. या घराण्याची माहिती आम्ही प्रकरण ३ रे लिहिले त्या वेळी नव्हती. पुस्तक छापीत असतां शेवटी शेवटी ती मिळाली. । २. घराणे ११ वे मूळ कोणत्या ठिकाणचे हें पूर्वी कळले नव्हते. ते सडेपिरंदवणे येथील असल्याचे आतां निश्चित कळले आहे. संशोधन क्र. २७ चा या घराण्यांत समावेश झाला आहे. ३. घराणे २४ हें गोळपचे आहे असे क्षेत्रोपाध्यायांकडील लेखांवरून ठरते. ४. संशोधन क्रमांक ११ यांतील व्यक्तींची पूर्वी कांहीं माहिती कळली नव्हती. त्यांचा आतां तपास लागला असून त्यांस आतां स्वतंत्र घराणे क्रमांक ३३ दिला आहे. त्यांचे मूळगांव कासारवेली आहे. ५. संशोधन क्र. ४३, ४६ व ६३ मधील व्यक्तींनी आपले मूळगांव अनुक्रमें, गोलप-सडिये, वसणी व पावस सांगितले आहे. ६. पेशवेदप्तर जमाव रुमाल ५०० मधील स. १७९४ चे जमाबंदी कुलकर्णी कागदांत मौजे मावळंगे तर्फ पावस येथे “ ठिकाण पेंडसा' असा उल्लेख आहे.