पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण |: २ १ १२ एका विशिष्ट पद्धतीला अनुसरून त्याला ज्ञात असलेल्या अगर अवश्य असलेल्या ऋचा एकत्र केल्या व ऋग्वेदाची एक शाखा वनविली. हीच आपली शाकल शाखा. या शाखेशिवाय फक्त बाष्कल शाखा असल्याचे नमूद आहे; परंतु तिची संहिता उपलब्ध नाही. तसेच यज्ञामध्ये आहुति कशी द्यावी, एखादं कर्म कोणत्या रीतीने करावें अगर त्या वेळी कोणता मंत्र म्हणावा अशा कर्ममार्गीय गोष्टींबद्दल मतभेद उत्पन्न होणे साहजिकच होते. हे सर्व मतभेद हळू हळू ग्रंथ रूपाने एकत्र करण्यांत आले; त्यांना ब्राह्मण हें नांव देण्यांत आले. एखाद्या ऋचेचा अर्थ, वैदिक शब्दांची व्युत्पत्ति, कर्मकांडांतील गोष्टींबद्दल संवादरूपानें अगर इतिहासरूपाने चर्चा वगैरे विचार या ब्राह्मण ग्रंथांत केलेले आहेत. निरनिराळ्या संहितांचे अर्थनिर्णायक ग्रंथ म्हणून हे ब्राह्मण ग्रंथ आज उपलब्ध आहेत. ऋग्वेदाच्या आपल्या शाकल शाखेचा ब्राह्मण ग्रंथ ऐतरेय ब्राह्मण या नांवाने प्रसिद्ध आहे. मतभेदाची ही परंपरा वेदांच्या निरनिराळ्या शाखा व निरनिराळे ब्राह्मण ग्रंथ होऊनच थांबली नाही तर पुन: एक एका शाखेच्या अनुयायांतही बरेचसे भेद पडले व त्या भेदांचे दर्शव वेगवेगळे ग्रंथही निर्माण झाले. तसेच मंत्र आणि ब्राह्मण यांचे पठण, त्यांचे व्याकरण, त्यांचा अर्थ लावणे इत्यादि गोष्टींकरितां प्रत्येक शाखेत वेगवेगळी ग्रंथरचना झाली आणि शिक्षा ( वेद कसे पठण करावे इ. ), कल्प ( कर्मे कशी करावीं), व्याकरण, निरुक्त ( अर्थ कसा लावावा व व्युत्पत्ति कशी जाणावी ), छंदशास्त्र आणि ज्योतिष ( कर्मे करण्याचा योग्य काल वगैरे ठरविणारे शास्त्र ) अशी सहा प्रसिद्ध शास्त्रे निर्माण होऊन त्यांवर ग्रंथ झाले. ( यांना वेदांगे म्हणतात.) अर्थात् हे निरनिराळ्या ऋषींनी आपआपल्या अनुयायांकरितां संपादिले. आपण ज्याला दशग्रंथी ब्राह्मण म्हणतो तो संहिता आणि ब्राह्मण यांशिवाय शिक्षा, व्याकरणासारखे वर दर्शविलेले ग्रंथ म्हणतो, आणि आपआपल्या शाखेचे असे दहा ग्रंथ म्हणावयाचे असल्यामुळे शाखेचे संपूर्ण अध्ययन करणारास अर्थातच दशग्रंथी ही अन्वर्थक संज्ञा मिळाली. या वर वणलेल्या वेदांगांपैकी कल्प हे वेदांगच कालाने जास्त महत्त्वाचे ठरलें. कर्मकाण्डाचाच कांहीं काल जास्त प्रसार होता आणि त्या काली पूर्वाचार्यांनी कशी कर्मे केली हे सांगणारे, कर्माविषयी निरनिराळे नियम ठरविणारे " सूत्र नांवाचे ग्रंथ निर्माण झाले. आणि या सूत्र ग्रंथांनीच बरेचसे ब्राह्मणांचे भेद निर्माण केले आहेत. एकंदर कर्मकाण्डाचे श्रौत व गृहय असे दोन भाग करता येतात. श्रौत कर्मे म्हणजे वेदांत सांगितलेले सोमयाग किंवा हविर्यज्ञासारखे यज्ञ. या श्रौत कर्माविषयींची सूत्रे श्रौतसूत्रे या नावाने प्रसिद्ध आहेत. उपनयन, विवाह वगैरेसारख्या घरगती विधींना गृहय म्हणजे घरांतील अशी संज्ञा मिळाली, व त्यासंबंधींची सूत्रे गहचसुत्रे या नांवाने प्रसिद्ध आहेत. तसेच मनुष्याने कसे वागावे वगैरे संबंधींचे