पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें ] प्रयोजन क्रमप्राप्त आहे. तो अद्ययावत ठेवावयाचा तर त्यांतील माहितींत ठराविक कालमर्यादेनंतर भर घातली पाहिजे. आपले घराण्याचा वृत्तान्त प्रसिद्ध होऊन १० वर्षे झाली. १० वर्षापूर्वी जी मुले विद्यार्जन करीत होती त्यांतील बरीच आज विद्यार्जन पूर्ण करून अर्थप्राप्तीसाठी अनेक व्यवसाय करीत आहेत, कांहीं विवाह करून गृहस्थाश्रमांत आहेत. कित्येक जागतिक युद्धांत भाग घेण्यासाठी रणांगणावर जाऊन आले आहेत. कुलांत नूतन गृहरत्ने आली आहेत; तसेच कांहीं वृद्ध आपली संसारयात्रा पूर्ण करून निजधामास गेले आहेत. कांहींचे याच भूलोकावर स्थलांतर झाले आहे. या सर्व गोष्टींची योग्य ती नोंद होऊन वृत्तान्त अद्ययावत राहिला तर तो उपयुक्त राहील या हेतूने हा द्वितीय खंड तयार करण्याचे आम्हीं ठरविलें. ऐतिहासिक दृष्टया उपयुक्त अशी माहिती सरकार दप्तरी मिळते म्हणून पुणे येथे असलेल्या पेशवे दप्तरांतील कागदपत्र पहाण्याची अनुज्ञा दक्षिण भागाचे कमिशनर यांजकडे वृत्तान्त प्रसिद्धीपूर्वी आम्हीं मागितली होती, परंतु ती नाकारण्यांत आली. ती मिळावी या दृष्टीने खटपट करण्याकरितां आम्ही कुलवृत्तान्त संघ दि. १६ जुलै १९३८ ला स्थापन केला व त्या संघाने मंबई सरकारकडे कुल वत्तान्त लेखकास पेशवे दप्तर खले करावे असा विनंती अर्ज पाठविला. कायदेमंडळांत या विषयावर श्री. मंडलीक यांनी प्रश्न विचारले. इंडिअन हिस्टारीकल रेकार्ड कमिशनच्या १९३८ डिसेंबरमध्ये पुण्यास भरलेल्या बैठकीत रा. ब. गो. स. सरदेसाई व महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांनी या विषयास चालना दिली. केसरी इत्यादि पत्रांनों यास प्रसिद्धि दिली. सुदैवाने याच वेळी मुंबई प्रांतांत लोकमतानुवर्ती सरकार अस्तित्वात आले होते. त्यामुळे ह्या प्रश्नाचा विचार सहानुभूतिपूर्वक होऊन पेशवे दप्तर कुलवृत्तान्तलेखकांस प्रयोगादाखल एक वर्ष विनाशुल्क खुले केले. ही मुदत पुढे आणखी एका वर्षाने वाढविण्यांत आली. या सवलतीचा फायदा आम्ही घेण्याचे ठरवून फेब्रुवारी १९३९ पासून तीन महिने रोज पेशवे दप्तरांत जाऊन तेथील निरनिराळे रुमाल पाहून शक्य तितकी माहिती आणिली. रा. गणेश पांडुरंग पेंडसे हे दररोज आमच्याबरोबर या कामासाठी येत असत. सातारा येथे असलेला पारसनीस ऐतिहासिक वस्तुसंग्रह पूण्यास डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅन्ड रीसर्च इन्स्टिट्यूटकडे आला आहे त्यांतील कागद एप्रिल १९४७ मध्ये आम्ही पाहून माहिती घेतली. अशा रीतीने मिळविलेल्या इतिहासकालीन माहितीस प्रसिद्धि देऊन वृत्तान्त परिपूर्ण करणे हे क्रमप्राप्त झाले. हेही दुसरे कारण या द्वितीय खंडाचे प्रकाशनास आहे. क्षेत्रोपाध्यायांकडील लेखांचा उपयोग प्रथम खंडांत केला आहे. त्या वेळीं वेरूळ, पैठण इत्यादि ठिकाणचे लेख मिळाले नव्हते; ते नंतर मिळविले त्यांचा उपयोग यांत केला; त्यामुळे घराणी क्रमांक २८ व ३० हीं एक असल्याचे कळले.