पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-******

i n ॥

  • *

पेंडसे—कुल- वृत्तान्त । [ प्रकरण आहे. वेदकालींही यज्ञयागासारखी कम करतांना यजमानाला आपल्या पूर्वज wषींचा स्मरणपूर्वक नामोच्चार करावा लागे. संध्या करणारे संध्येमध्ये प्रत्यहीं आपल्या ऋषि-पूर्वजांचा उच्चार करीत असतात. पितृतर्पणाचे वेळीं पिता, प्रपिता व प्रपितामह यांना तर्पण करावे लागते. पौष्टपदी (भाद्रपद शु. १५) श्राद्धांत वृद्ध प्रपितामह, त्याचा पिता आणि पितामह यांचे स्मरण करावे लागते. अशौचासंबंधानेही सात पिढ्या अगर दहा पिढ्या अशौच पाळावे अशी धर्माचार्याची आज्ञा आहे. या सर्वांचा अर्थच असा की, पूर्वजांची स्मृति कायम ठेवणे हे मनुष्यमात्राचे स्वभाववैशिष्ट्य आहे. पशुपक्षी व मानवजात यांमधील भेद दर्शविणा-या गुणधर्मापैकीं जन्मदात्या मातापितरांविषयींचे ज्ञान व स्मृति असणे हा एक गुणधर्म आहे. पशुपक्षी संगोपन कालापुरतेच मातापितरांना ओळखतात, उलट पक्षीं मनुष्यप्राणी वर दर्शविलेल्या मार्गांनी अनेक पिढ्यांपर्यंत पूर्वजांची स्मृति कायम ठेवतो. आतां अलीकडील कालामध्ये पितृतर्पण करणे, श्राद्ध करणे किंवा सुतक पाळणे हे पूर्वजांची स्मृति ठेवण्याचे मार्ग कित्येकांस फोल वाटू लागले असले व तपशिलाचे वाबतींत मतवैचित्र्य झाले असले तरी स्मृति ठेवण्याचे तत्त्व सर्वमान्यच आहे. कारण, दिवंगत थोरांच्या स्मृति कायम ठेवण्यासाठी त्यांच्या पुण्यतिथी पाळण्याचे प्रघात नव्याने सुरू होत असल्याचे आपण पाहतो. त्याचप्रमाणे ग्रामदेवतांना नैवेद्य दाखविणे व देवळांत नंदादीप लावणे असल्या कृत्यांस खूळ मानणारे, आपल्या गांवीं शाळा स्थापून किंवा वाचनालय सुरू करून तेथे ज्ञानदीप अखंड तेवत ठेवतात व अशा प्रकारे स्वग्रामाची सेवा करतात; श्राद्ध-पक्ष न ओळखणारे, आपल्या जन्मदात्या पित्याचे स्मरण आपल्या पश्चातही कायम रहावे म्हणून स्वतःच्या निवासस्थानाला त्याचे नांव देतात; किंवा एखाद्या सार्वजनिक संस्थेकडे निधि देऊन त्याचे व्याजांतून शिष्यवृत्ति, पारितोषिक किंवा भोजन देवविण्याची योजना करतात, पुतळे उभारतात किंवा तैलचित्रे लावतात किंवा एखादे साहित्याचार्य आपल्या मातापितरांची स्मृति चिरकाल रहावी म्हणून त्यांच्या नांवानें कांहीं रकमेचा विनियोग श्रेष्ठ प्रतीच्या साहित्यनिमतीकडे करितात, हेही आपण पाहतों. . तात्पर्य, पूर्वजांची स्मृति ठेवण्याचे नवे जुने अनेक प्रकार आहेत. त्यांपैकीच नव्या काळास अनुसरून व मनुष्याच्या चिकित्सक बुद्धीस पटेल असा हा कुलवृत्तान्त लिहिण्याचा प्रघात आहे. अलीकडे चरित्र कोश, महाराष्ट्र परिचय, Who's Who in India, Who's Who in Western India इत्यादि परिचयग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. वृत्तान्त हा एका कुलापुरता कोशच होय. अमेरिकेसारख्या पाश्चात्य भधारणेच्या शिखरावर असलेल्या देशांतहि ही प्रथा असून तेथे सुमारे २००० कटंबांचे वत्तान्त लिहिले गेले असून या कामाकरितां संस्थाही स्थापन झाली आहे.. यावरून कुलवृत्तान्त होणे ही कल्पना आतां सर्वमान्य झाली आहे हे यानांत येईल. कुलाचा वृत्तान्त होणे जसे अवश्य आहे तसे तो अद्ययावत असणे हे