पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। । । । ... । । ?! - पेंडसे-कुल-वृत्तान्त । ८ । कि व रखंड २ रा हो । राजा. ਤੇ ਨਾ ਹੀ , ====---- । । . . प्रकरण १ ले । । याजन इन । . प्रमाण पेंडसे- कुल- वृत्तान्त प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्तान्त- प्रसिद्धीच्या प्रथेकडे लोकांचे विशेषतः चित्तपावनांचे लक्ष वेधले गेले. व आजपर्यंत लिमये, साठेसाठ्ये, भावे, चापेकर, खरे, सोमण, गद्रे, डोंगरे, काळे-वत्सगोत्री, चिपळूणकर, मोडक, नित्सुरे, मराठे, छत्रे, कानिटकर, आठल्ये, गुण्ये व पाचेशेटे या कुलांचे वृतान्त प्रकाशित झाले आहेत. पोंक्षे, सोवनी-सोहनी, लेले व नाडकर यांचे वृत्तान्त मुद्रणालयांत आहेत. केळकर व बेडेकर यांचे तयार होत आहेत. अभ्यंकर, आगाशे, काणे, गणपुले, गोगटे, जोग, जोशी, (शांडिल्य गोत्री), टिळक, दातार, नामजोशी, पटवर्धन, पाटणकर, पाळंदे, फडके, भागवत (मायदेव), भिडे, मेहेंदळे, म्हसकर, रानडे, लोंढे, साने, सिद्धये, पोतदार (ओरपे), तांबे, राजोपाध्ये, धडफळे, घाटपांडे, देशपांडे, दास्ताने, ढापरे, चिटणीस (वैद्य), चौधरी, मोरे, रहाटे, साठे इत्यादि कुलांची माहिती एकत्र करण्याचे प्रयत्न झाल्याचे कळते. स. १९४४ सालीं सोलापुरला भरलेल्या चित्तपावन परिषदेने व स. १९४७ सालीं त्र्यंबकेश्वरला अखिल शुक्ल यजुर्वेदी माध्यदीन ब्राह्मण संमेलनाने प्रस्ताव करून कुलवृत्तान्त प्रथेचा पुरस्कार केला असून सर्व ब्राह्मणांनी आपआपल्या कुलांचे वृत्तान्त प्रसिद्ध करावे अशी प्रोत्साहनपर विनंती केली आहे. | मोठेपणाचा गाजावाजा करणे हा कुलवृतान्त लिहिण्याचा हेतू नसन घराण्याचे पूर्ववृत्त व पूर्वपरंपरा हो, श्रेष्ठ अगर लोकोत्तर असोत वा नसोत, घराण्यामध्ये पुढील पिढ्यांकरितां चिरस्थायी रहावी, या प्रधान हेतूने कुलवृत्तान्त लिहिले जात असून त्यांचे स्थान मुख्यतः घराण्यांच्या किंवा कुटुंबीयांच्या दप्तरांच रहावयाचे आहे. पूर्वजांची सादर 'स्मृति ठेवणे हा आपणां आर्याचा एक गुणविशेष