पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रें] .. अभिप्राय २४ प्रायश्चित्त घ्यावे. कारण तसे करण्याने त्यांचीच प्रतिष्ठा खरोखर वाढणार आहे. असो, सरते शेवटों इतकेच सांगावयाचें कीं, प्रत्येक पेंडसे आडनांवाच्या गृहस्था या ग्रंथाची एक प्रत अवश्य विकत घेऊन संग्रही ठेवावी व संपादकांनीं आयत्य तयार करून जोडलेल्या कोन्या कागदावर आपली चालू पिढ्यांची माहिती भरून ठेवावी. असे होईल तर कालांतराने चालू पिढ्यांचाहि विश्वसनीय इतिहास आपोआपच आयता तयार होईल. | य. न. के. रा. पुरुषोतम बळवंत गोळे, बी. ए. एल्एल्. बी. अॅडव्होकेट, मंत्री, मध्यप्रांत, अकोला. "दि. १३-२-१९३९. आपले घराण्याचा इतिहास छापून ऐतिहासिक माहितीत भर घातली आहे. मागील कुलवृत्तान्तापेक्षा आपण आपले घराण्याची माहिती जास्त दिली आहे. व्यक्तींची छायाचित्रे दिल्याने ग्रंथास जास्त उठावण आली आहे. एकंदरात पुस्तक चांगले साधले असून माहितीही पुष्कळ दिली आहे.” डॉ. विश्वनाथ नारायण थत्ते, डी. एस्सी. प्रोफेसर, नागपूर. " सेवानिवस झाल्यावर कामाचा उत्साह ठेवून हे कार्य आपण पुरे केलेत याबद्दल आनंद वाटतो. आपल्या प्रयत्नांमुळे कुलवृत्तान्त लिहिणारांस पेशवे दप्तराची मदत मिळेल ही आपली विशेष कामगिरी आहे.. कुलवृत्तान्तांत ज्या गोष्टी यावयास पाहिजेत त्यांत निरनिराळ्या व्यक्तींची व कुटुंबांची आर्थिक स्थिति व शारीरिक स्थिति, आनुवंशिक व्यंगे, व्याधि वगैरे गोष्टींची जरूर माहिती पाहिजे. कारण अशी माहिती मिळाल्यास इतर पेंडसे मंडळीस त्यावर काय योजना-उपाय करावे ते सुचेल. इतिहासांत पूर्वजांनी काय कामगिरी केली त्याची माहिती हवीच. परंतु सध्यां अनेक दष्टींनों आलेली विषम स्थिति सुधारण्याचा प्रयत्न कुलसंघटना झाली तरच शक्य आहे. संघशक्तीच्या मदतीनेच आज निभाव लागेल. तरी आपल्या मित्रमंडळींत याची चर्चा करून निदान पुणे शहरापुरती माहिती मिळवावी. माहिती गुप्त राखण्याची खबरदारी घेतल्यास अडचण पडू नये असे वाटते. असो. कामाच्या उत्साहाबद्दल आपलें । | वे. परशुराम महादेव गद्रे, गुरुजी, हिरण्यकेशी वेदपाठशाळा, पुण. *दि. १९-३-१९३९. अवघ्या दीड वर्षात कुलवत्तान्तासारखे कट पुरे केलेत याबद्दल मी आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो. मी गद्रे कुलवृत्तान्त लिहीत असल्यामुळे हे काम किती खर्चाचे व मेहनतीचे आहे याची कल्पना मला चांगलीच आहे. आपले घराण्याची अ णबी जास्त माहिती आपले हातून अशीच लॉकर बाहेर पडो अशी श्रीपरमेश्वराजवळ प्रार्थना करतो." श्री. पावतीबाई श्रोत्री, पुणे. “दि.२६-३-१९३९. इतके भारदत् परिश्रमाचे व मोठ्या इतिहासकाराला शोभेल असे जोखमीचे काम आपण उतरवत हौसेनें पं. कु. व. १६ ( ०