पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४०. पेंडसे—कुलवृत्तान्त [ परिशिष्ट -~-~ ~ - .. .:

.
.:::::.-

.-- २०... .. प्रथा दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर आहे हे अभिनंदनीय होय. माणसांचे कुटुंब व कुटुंबांचा देश अशी साखळीच असल्यामुळे कुटुंबांच्या किंवा कुळांच्या इतिहाससंशोधनाने एकाच वेळी अनेक व्यक्तींचे व कालखंडांचे संशोधन सहज होऊन जाते. अशा कुलवृत्तांतून नवीनच पुढे आलेली कितीतरी माहिती, व्यक्तिनिश्चय, कालनिश्चय किंवा स्थलनिश्चय करण्यास किती उपयोगी पडते हे इतिहाससंशोधकांच्या चांगले परिचयाचे आहे. | आतापर्यंत घराण्यांचे इतिहास पाहिले तर त्यांत आपटे, बर्वे, रास्ते, परांजपे, थत्ते, कोल्हटकर इत्यादि सुमारे ८।१० इतिहास किंवा कुलवृत्तान्त प्रसिद्ध झाले. त्यांपैकी बहुतेक चित्तपावनांचेच आहेत. देशस्थ पानसे व कहाडे सरदेसाई यांचे अवघे एकेकच दिसतात. या दृष्टीने चितपावनांना अभिमानच वाटेल. वास्तविक देशस्थ कुलांची संख्या अफाट; तसेच क-हाडे कुलेंहि कोंकणस्थाखालोखाल भरतील. शिवाय त्या कुलांचीहि कामगिरी महत्त्वाचीच आहे. करतां देशस्थ व क-हाडे कुलांतील अभिमानी व अभ्यासू लोकांनी या बाबतींत चित्तपावनांच्या इर्षेने तरी भराभर आपापले कुलवृत्तान्त साधनांसहित संशोधित करण्याची खटपट करणे जरूर आहे. । प्रस्तुतचे पेंडसे कुलवृत्तांताचे पुस्तक पुण्याचे रहिवासी व सेवानिवृत्त सरकारी नोकर रा. कृष्णाजी विनायक पेंडसे यांनी सर्व खटपट करून तयार केले आहे. सदर कुलवृत्तान्त रचनेचे काम अंगावर घेतल्यानंतर त्यांना किती खटपट करावी लागली असेल, किती पत्रव्यवहार करावा लागला असेल, किती मेहनत व किती खर्च पड़ला असेल, याची जाणीव अशी कामे करणा-यांसच फक्त एकटी येऊ शकेल. आपल्या कुलासंबंधीचा हा साधार इतिहास सालंकृतपणे प्रसिद्ध करून श्री. पेंडसे यांनी आपले पैतृक ऋण चांगल्या रीतीने फेडलें आहे. या ग्रंथांत प्रयोजन, भृगुकुलोत्पन्न पेंडसे, मूलस्थान, ऐतिहासिक कागदपत्रे व अल्लेख, मुरडीचे महाजनकीचा वाद, वंशावळी, घराण्यांची माहिती त्यांतील व्यक्तिवर्णनासह व सामान्य विचार अशी आठ प्रकरणे आहेत; व ती सर्वच फार कसोशीने माहिती जमवून व निराग्रह पद्धतीने सिद्धान्तदर्शन करून लिहिलेला आहेत. दुसरे प्रकरण, तिसरे प्रकरण व आठवें प्रकरण हीं सामान्य वाचकालाहि माहिती व मनोरंजन पुरवू शकतील. ऐतिहासिक कागदपत्रांचे व ऐतिहासिक व्यक्तिवर्णनाचे प्रकरण तर इतिहासाभ्यासकांना फारच उपयुक्त आहे. श्रीयुत पेंडसे यांनी अश्रांत परिश्रम करून इतकी माहिती गोळा केली व इतके कागदपत्र जमविले तथापि अद्यापहि त्यांना न मिळालेली माहिती किंवा कागदपत्रे पुष्कळच असतील असे पहिल्या प्रकरणांत त्यांनी केलेल्या तक्रारीवरून दिसते. आता हा ग्रंथ पाहिल्यावर तरी प्रत्येक पेंडसेकुलोत्पन्नाने आपल्या घरचे दप्तर पाहून व या इतिहासाला उपयोगी पडेल अशी माहिती पुरवून आपल्या अनास्थेचे