पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४२ पेंडसे-कुलवृत्तान्त केलेत याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे. वंशावळीच्या विस्तृत अशा भरगच्च फांद्यांतून अंगाला ओरखडे पडले तरी त्यास न जुमानतां वृक्षाचे शिखर गांठलें व सामान्य विचार या प्रकरणांत या वृक्षाचे जे आपण सिंहावलोकन केले आहे ते उदबोधक आहे. गरीब कुलांत जन्मन उच्च पद पावलेले त्यांत आहेत, तर रावाचे रंक झालेले असेहि पण त्यांत आहेत. आपण कुलपित्याप्रमाणे सर्व तरुण पेंडसे कुलोत्पन्नांना हा त्यांचा इतिहास त्यांना सादर करून उत्तिष्ठ, जातप्रमाणे या ग्रंथाच्या रूपाने उपदेशच केला म्हणाना. श्राद्धपक्ष ब्राह्मणसंतपणे घालून सव्यापसव्याची अर्थशून्य कवाईत करण्यापेक्षा आपल्या पूर्वजांचे स्मृति ऋण फेडण्याचे नवीन, अलौकिक व बिकट असे कृत्य आपण या ग्रंथरूपानें केलें आहे." पुरवणी माहिती, घराणे १३ वें, चौक-पंचनदी। खंड पहिला, पृष्ठ २४५ ** महादेव रामचंद्र (९) ज. स. १९०६ जून १५. वास्तव्य चंदूलाल जेसिंगभाई बिल्डिा , २२६-२८ न्यू चर्नीरोड, गिरगांव, मुंबई. भार्या शांता (ताई), ज. स. १९१३ डिसें. ११. पि. कृष्णाजी नारायण पाळंदे, कुंदगोळ. * विष्णु महादेव (१०) ज. स. १९३६ मार्च ७. * वसंत मह देव (१०) ज. स. १९३९ एप्रिल २९. * शरच्चंद्र महादेव (१०) ज. स. १९४६ एप्रिल १९. | घराणे १७ वे, खंड पहिला, पृष्ठ ३१२ * महादेव चितामण (६) कन्या (४) द्वारका (गगा), ज. स. १९१३ जाने. २. पुण्यास नुतन मराठी विद्यालयांत शिक्षिका आहेत. सेकडईअरट्रेन्ड, ड्रॉइंगची परीक्षा उत्तीण, विद्यालयातर्फे मॉन्टेसरी कोर्सला यांस पाठविले होते. त्यांत दुस-या वर्गात उत्तीर्ण होऊन डिप्लोमा मिळाला. मध्यम वर्गीयांच्या मुलांकरितां दोन वर्षात प्राथमिक तीन यत्ता शिकविण्याचा सुभाष शिशु मंदिर' या नांवाचा वर्ग चालवीत असत. यांना मातकामाची आवड असून मूत चांगल्या करतात. स्वभाव मनमिळाऊ व दुस-याच्या उपयोगी पडण्याची स्वाभाविक प्रवृत्ति आहे. सौ. द्वारकाबाई साठे