पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय ३ रें] परििशष्ट ३ अभिप्राय वे. अंबादास बाबूदास पाराशरे, गंगामंदिर, नाशिक पंचवटी. "दि. १५-१२ १९३८. पुस्तक अतिशय चांगले झाले आहे. आपण अगदी थोड्या अवधींत नी सर्वांगसुंदर माहिती मिळवून पेंडसे कुलाचा उद्धार केला याबद्दल आम्हांस फारच संतोष । व आनंद वाटत आहे. रा. भालचंद्र गजानन नित्सुरे, आंजर्ले. “दि. ४-१-१९३९. आपला व माझा परिचय नसतांना हे पत्र लिहिण्याची प्रबळ इच्छा होण्याचे कारण आपण संपादिलेला पेंडसे घराण्याचा वृत्तान्त हा ग्रंथ हेच होय. आमचे स्नेही रा. गोविंदशास्त्री पेंडसे यांनी मला या ग्रंथांतील बराच महत्त्वाचा भाग वाचून दाखविला. मी अशा प्रकारचे कुलवृत्तान्त फक्त चार पांच पूर्वी वाचले आहेत. त्यांशी तुलना करतां आपला ग्रंथ सर्वोत्कृष्ट व नमुनेदार झाला आहे. आपण लष्करी खात्यांत मोठ्या दर्जाची नोकरी केली असल्यामुळे सरकारी कामाचा अनुभव व मुळची आपली स्वाभाविक कुशाग्र बुद्धि व त्यांतच सार्वजनिक कामाची आवड व द्रव्याची अनुकूलता या सर्व गोष्टी ग्रंथ नमुनेदार होण्यास कारणीभूत झाल्या आहेत. निरनिराळ्या पुरुषस्त्रियांचीं आयुष्यमानासंबंधी काढलेलीं अनुमाने व दुस-या अशाच गोष्टी देऊन आपण ग्रंथ बोधप्रद केला आहे. विशेषेकरून ऐतिहासिक कागदपत्रांवरून आपण पेंडसे कुलांतील काही पुरुषांची जी साधार माहिती दिली आहे तीमुळे ग्रंथाची रुक्षता जाऊन तो ज्ञान व करमणूक करतो. उदाहरणार्थ, बाजीरावने आपले पत्नीची बत्तीस लाख रुपये देऊन केलेली एकोतिष्ठता (एकोदिष्ट श्राद्ध). XX जुन्या सनदा वाचण्यांत निष्णात असलेल्या पेंडशांबद्दल वगैरे माहिती. । आपणास हा ग्रंथ तयार करण्यास किती परिश्रम लागले असतील याची मला पर्ण जाणीव आहे. पेन्शन घेतल्यावर सार्वजनिक हिताची कामे करणारे पेन्शनर आजपर्यंत थोडेच निघाले. आतां पुण्यास पेन्शनर लोकांचा एक संघ निघाला आहे. त्या उदाहरणाने पेन्शनर लोकांत नवीन प्रथा सुरू झाल्यास एक प्रकारे देशाचा फायदाच होईल. पेन्शनर लोकांचे पदरीं स्वाभाविकपणे दीर्घकाल नोकरीतील अनुभव असतो, तो पुष्कळ बाबतींत व्यर्थ जातो असा आजवरचा अनुभव आहे. माहिती मिळवितांना स्त्रीपुरुषांची वजने व उंची नोंदण्यांत आली तर पुढील शंभर वर्षानंतर हल्लीचे माहितीचे आधारावरून पुढील प्रजेची किती अवनति किंवा उन्नति झाली हे कळेल". केसरी, पुणे. ता. ३ जानेवारी १९३९. * महाराष्ट्राच्या इतिहाससंशोधनाच्या वाढत्या व्यापांत घराण्यांचे इतिहास साधनासहित संशोधन करून प्रसिद्ध करण्याची