पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ पेंडसे कुलवृत्तान्त [ परिशिष्ट डॉ. महादेव विष्णु, इंदापूर. "दि. २६-११-१९४७. आपण घेत असलेल्या परिश्रमाबद्दल फार आनंद वाटतो." रा. पुरुषोत्तम रामचंद्र, सेवानिवृत्त सि. सुपरिंटेंडंट, यु.पी. अकाउंटंट जनरलचे ऑफिस, ग्वाल्हेर. “दि. ८-३-१९४८. आपण पेंडसे कुलवृत्तान्ताबद्दल इतकी तसदी घेऊन हौशीने हे काम करीत आहां याबद्दल आपलें मनापासून कौतुक करावेसे वाटते." रा. मुकुंद पांडुरंग, सेवानिवृत्त हेडसिग्नलर, जी. आय. पी. रेल्वे, काशी. “दि. १८-३-४८. शक्य ती मदत करण्यास मी तयार आहे. व वास्तविक पहातां तें माझे कर्तव्यच आहे. आपण किती श्रम घेत आहांत !" रा. गणेश अनंत, गिम्हवणे. * दि. २९-६-१९४८. नवीन आवृत्ति काढल्याबद्दल आपले आभारी आहों." रा. सदाशिव कृष्ण, शिक्षक, सोलापूर. “दि. ७-१०-१९४८. आपण हातीं घेतलेल्या कामांत संपूर्ण यश चितितों. आपणांस दीर्घायुष्य मिळो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे." रा. दामोदर गजानन, रेल्वेगार्ड, दादर. “७-१०-१९४८. आपण पेंडसे कुलवत्तान्ताचा दुसरा भाग प्रसिद्ध करण्याचे ठरविलेले ऐकून फारच आनंद झाला. रघुनाथ रावजी, खोत, धामणी. “ दि. ५-७-१९४८. आपण अत्यंत परिश्रम करून परत दुसरा खंड छापीत आहोत. याबद्दल अत्यंत आनंद होत आहे." रा. दिनकर श्रीराम, मुख्य गुरुजी, मराठी शाळा, वांकवली. "दि. २७-१०१९४८. हे काम आपणां सर्वाचे आहे. अर्थात त्यास अधिकाधिक हातभार लावणे आमचे कर्तव्यच आहे." रा. विनायक चिंतामणि, सांगली. “५-११-१९४८. आपण पेंडसे कुलग्रंथासाठी जी खटपट करतां त्याबद्दल मी आपला आभारी आहे.