पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें] । कुलबंधू काय म्हणतात २३७ देतांना ती जशी द्यावयास पाहिजे तशी दिली जात नाही. यापुढे जेव्हां दुसरी आवृत्ति निघेल त्या वेळी जास्त व्यवस्थेशीर आणि विश्वसनीय माहिती मिळेल असे वाटते. ऐतिहासिक माहितीहि तोपर्यंत जास्त उपलब्ध होईल. ग्रंथाची मांडणी विस्तृत रीतीने केली आहे आणि छायाचित्रे जोडल्याने तो आकर्षक झाला आहे. सर्व साधारण माहितीची प्रकरणे फार उपयुक्त आहेत. | सौ. सुलोचनादेवी, धनतोली, नागपूर, “ दि. ११-१-१९३९. जगदीश्वर की कृपा और आपके अनुग्रह से मैं पेंडसे कुलवृत्तान्त पुस्तक के बारे में अपनी सम्मती लिखी हूं. अपने पूर्वजनोंका इतिहास जानना अतिआवश्यक है व आपके कष्टोंका, श्रेय यही है कि हम बलवान बनें व इस पुस्तकको रत्न समझ अपने पास रखें व उसे पढे. अपनी त्रुटीयोंको समझ उन्हें सुधारें व हमारी ऐतिहासिक बातोंपर एक बून्द अमृत समझ सागर भरे व आपको मदत करे, प्रत्येक जन इसे खरीदे व आपके उत्साह को बढावे. " । | रा. विट्ठल शंकर, बी. ए. मामलतदार, सांगली. "दि. २७-८-१९३९. आपण अत्यंत श्रम करून कुलवृत्तान्त प्रसिद्ध केला आहे. अशा ग्रंथाचा मराठी वाङमयांत भर म्हणून जरी निर्देश करता आला नाहीं तरी पेंडसे कुलोत्पन्नांना एकमेकांविषयी आपुलकीची भावना उत्पन्न करण्यास या ग्रंथाचे प्रसिद्धिकरण खास कारणीभूत होईल अशी माझी समजूत आहे. या घराण्यातील प्रसिद्ध व्यक्तींची माहिती निराळे परिशिष्ट देऊन छापल्यास जास्त उपयुक्त होईल. रा. गंगाधर केशव, अकाउन्टन्ट, नागपूर, दि. ७-११-१९४०. पेंडसे कलासाठी आपण विनामोल परिश्रम करून सर्व कुलास उपकृत करून ठेविले आहे. त्याबद्दल चुलते व वडील यांचे वतीने मी आपले आभार मानतो. ३ दुस-या खंडाच्या प्रकाशनापूर्वी रावसाहेब गोविंद रामचंद्र, सुपरिंटेंडेंट, ज्युडिशीअल कमिशनर ऑफिस, नागपूर. “दि.७-८-१९४७. आपण कुलवृतान्ताचा पुरवणी खंड प्रसिद्ध करण्याचा विचार करीत आहां हे फार चांगले आहे. गेले दहा वर्षांत कित्येक गोष्टो घडल्या असतील. आपण या कामांत एकसारखे लक्ष घालून उद्योग करीत आहां याबद्दल मला फार आनंद वाटतो." रा. जगन्नाथ रामकृष्ण, श्रीवर्धन. "२१-११-१९४७. आपण आपल्या घराण्याविषयों एवडी खटपट करून माहिती मिळवून दुसरा खंड छापीत आहां; याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो, सुयश चितितों व आभार मानतो."