पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ पेंडसे—कुल-वृत्तान्त [ परिशिष्ट ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• • ••••••••०००००००.०२.२.२.n n: ०००००००००००० रा. हरी कृष्ण, सीनीअर अकाउन्टन्ट मुंबई अकाऊंटंन्ट जनरलचे ऑफिस, ठाणे. “ दि. ३-१-१९३९. अभिप्राय लिहिणे म्हणजे अव्यापारेषु व्यापार म्हणावें लागेल. इतके सर्वांगसुंदर परिपूर्ण माहितीने भरलेले पुस्तक, शास्त्रीय विवेचन, बौद्धिक, आर्थिक वगैरे सर्व प्रकारे पूर्ण असे आहे. अशाबद्दल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. आपणांस ‘‘कुलदीपकच न म्हणता “वंशदीपक' म्हणावे असे वाटते. योडीसी आर्थिक परिस्थिति अनुकूल असतां परिश्रमाने जेवढे कांहीं करता येणे शक्य होते तेवढे काम झालेले आहे. XX पुण्यासारखें केंद्र आपणास लाभलें हेंही सुदैव म्हटले पाहिजे.XX आतां यापुढील कार्य म्हणजे कोणत्या तरी केंद्राच्या ठिकाणी लहानसे संमेलन भरविणे हे क्रमप्राप्त झाले आहे. आतां थोडा ऐतिहासिक पुरावा मिळविला पाहिजे. ते काम आपल्या लक्षांत आहेच. आपले विवेचन इतके सर्वांग. परिपूर्ण आहे की कोणाही विश्वविद्यालयीन पदवीधरास लाजेने मान खाली घालावी लागेल. रा. गोविदशास्त्री गणेश, आंजर्ले. “पौष शु. १२ शक १८६०. आतांपर्यंत झालेल्या कुलवृत्तान्तांहून आपला कुलवृत्तान्त निःसंशय चांगला आहे. निरनिराळी प्रकरणे घालून माहिती फार चांगली दिलेली आहे. खरोखर आपणासारखा हौशी, उद्योगी व खचक मनुष्य आमचे कुळांत आल्यानेच हा इतिहास झाला. याबद्दल खरोखर आनंद वाटला. पुस्तकाची भाषाशैलीहि चांगली साधली आहे. एकंदरीने पुस्तक सर्व बाजूंनी उत्कृष्ट झाले आहे व असा दुसरा खंड अधिक माहितीचा आपणाकडूनच कालांतराने निघेल अशी आशा आहे. व तशी ईश्वर आपणास स्फूति देईल. रा. शंकर गणेश, मळवली, जि. पुणे. “दि. ४-३-१९३९. हस्ते परहस्ते जा गोष्ट व्हावयास पाहिजे अशी इच्छा होती ती ईशकृपेने आपलेकडून घडून आली याबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच आहे. आतां आपणांस अशी सूचना करावीशी वाटते कीं शक्य कोटींत असेल तर दोनचार वर्षातून एकदा तरी पैडस मंडळींचे संमेलन भरवावे म्हणजे आपणांमध्ये जो तुटकपणा वाटतो तो न वाटता आपआपसांत स्नेहभाव वाढेल." रावसाहेब गोविद रामचंद्र, सुपरिन्टेन्डन्ट, जुडिशिअल कमिशनरचे ऑफिस, नागपुर व नारायण दामोदर, सुपरिन्टेडन्ट, अकाउन्टन्ट जनरलचे ऑफिस, नागपूर * २०-२-१९२९. कुलवृत्तान्त लिहिण्याचे त्रासदायक व मेहनतीचे काम सेवानिवृ" झाल्यानंतर उतार वयांत अंगावर घेऊन मोठ्या खटपटीने व काळजीपूर्वक केले याबद्दल आम्हीं अभिनंदन करितों. कुलवृत्तान्त लिहिण्याची नवीनच प्रथा सुरू झाली आहे व लोकांना ती अपरिचित आहे; त्यामळे ऐतिहासिक व इतर माहिती