२३५ २ रें] कुलबंधु काय म्हणतात va As/s wwwwwwwwwww | रा. पुरुषोतम, विठ्ठल, खोत, तळे, जि. कुलाबा. “मि. आषाढ शु. २ श. १८५९. आपले कडून पेंडसे कुलाचा वृत्तान्त तयार होत आहे ही गोष्ट अभिनंदनीय आहे." रा. लक्ष्मण पांडुरंग, सव्हेअर, ठाणे. “ दि. ८-८-१९३७. आपण हा जो कांहीं उपक्रम करीत आहां हा फारच चांगला आहे व त्या कामांत आपणांस यश उत्तमपैकी मिळावे अशी परमेश्वराजवळ मागणी आहे.' रा. नारायण विनायक, बी. एजी, अनाथ विद्यार्थी गृह, नाशिक. "ता. १२८-१९३७. आपण इतक्या मेहनतीने व आपलेपणाने में काम चालविलेले पाहून • आनंद वाटतो. आपले प्रयत्नांबद्दल अत्यंत आभारी आहे." रा. महादेव विश्वनाथ, बी. एससी. पोलीस सबइन्स्पेक्टर, बार्शी. " ता. २१-९-१९३७. आपण हाती घेतलेले कार्य भूषणावह आहे. ते उत्तम प्रकारे पार पडो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे." रा. जगन्नाथ रामकृष्ण, श्रीवर्धन. “ ता. १६-६-१९३८. आपण जे कार्य हाती घेतले आहे ते महाबिकट कार्य आहे. तरी त्यांत तुम्हांस ईश्वर यश देवो असे मी इच्छितों." रा. गजानन सीताराम, माटुंगा--मुंबई. “ता. २१-६-१९३८. आपला उद्योग स्तुत्य आहे व आमचे कुळांत असा पुरुष निर्माण झाला याबद्दल महा आनंद वाटतो." २ पुस्तक प्रकाशनानंतर रा. पुरुषोत्तम रामचंद्र, सीनिअर सुपरिन्टेन्डन्ट, यू. पी. अकाउन्टंट जनरल ऑफिस, प्रयाग. " दि. ४-१-१९३९. आपण फार परिश्रमपूर्वक हे काम केले आहे हे प्रत्येक पान वाचतांना सहज ध्यानी येते. नुसते परिश्रमच न करितां बद्धिमतेने मिळविलेल्या सामग्रीचे यथायोग्य चीज केले त्याबद्दल आपली स्तुति करावी तेवढी थोडी आहे. आपण पुस्तकांत लिहिल्याप्रमाणे खरोखरी पूर्णपणाने कुलाचे ऋण सव्याज फेडले असे मला वाटते. व त्याबद्दल आपल्या कुलांतील प्रत्येकजण आपली स्तुति करील. पैशाने, कष्टानें व बुद्धिमत्तेने आपण आपल्या वेळाचा सर्वतोपरी सद्व्यय करून हे पुस्तक निर्माण केले यांत शंका नाहीं. हे पुस्तक यापुढे जे आणखी कुलवृत्तान्त प्रसिद्ध होतील त्यांस पूर्णत्वाने खरोखर मार्गदर्शक होईल यांत संदेह नाहीं."
पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/265
Appearance