पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

wwwwwwwwwwwwwwwwwww . २३४ पेंडसे—कुलवृत्तान्त [ परिशिष्ट रा. श्रीरंग शिवराम, शिक्षक, वेणगांव बु, ता. कर्जत. * १८-२-१९३७. उद्योग स्तुत्य आहे. रा. गोविदशास्त्री गणेश, लोकल बोर्ड सभासद, आंजलें. * कातिक व. ३ श. १८५८. कल्पना पसंत आहे. मुर्डीच्या भाऊबंदांसही पसंत आहे. रा. जनार्दन राजाराम, खोत व व्यापारी, धामापूर. " दि. ११-३-१९३७. आपण पेंडसे घराण्याचा इतिहास लिहिण्याचे मोठे खर्चाचे व जबाबदारीचे काम हाती घेतले आहे ही गोष्ट आपणास भूषणावह आहे व आपण स्तुतीस पात्र आहां. माहिती पुरविणे आमचे कर्तव्य आहे. रा. शंकर गणेश, चौक, जि. कुलाबा. “दि. ४-३-१९३७. कुलवृत्तान्तासंबंधी . जाहिरात वाचून मनास फारच संतोष वाटला. मला फार दिवस असा उपक्रम कोणी तरी करावा असे मनांत घोळत होते; पण आमच्याने ती गोष्ट होणे शक्य नव्हते. आपण पुढे आलेले पाहून आनंद झाला. तरी त्याबद्दल आम्ही आपलें त्रिवार अभिनंदन करतो. डॉ. अत्माराम नीळकंठ, दहीसर, जि. ठाणें. “ दि. ७-४-१९३७. आपण फारच मेहनतीचे काम हाती घेतलेले पाहून मनास अत्यंत आनंद झाला. व या कामी ईश्वर आपणास सर्वतोपरी चांगली मदत करो अशी मी त्याजपाशीं नित्य प्रार्थना करीत आहे. XXईश्वर तुम्हांस हाती घेतलेले कामीं उत्तम बुद्धि देऊन कार्य सफल करो इतकीच इच्छा आहे." रा. भालचंद्र भास्कर, सहकारी पतपेढी, बडोदें. “ १३-४-१९३७. आपल्या कामगिरीबद्दल सर्व पेंडसे मंडळीतर्फे मी आपले आभार मानतों." डॉ. महादेव प्रभाकर, सब् असिस्टंट सर्जन, खातेगांव, संस्थान इंदूर. "ता- १९-५-१९३७ व ४-१०-१९३८. आपण पेंडसे घराण्याचा इतिहास लिहावयाच स्तुत्य काम सुरू केले आहे. तरी आपण हाती घेतलेल्या कामांत परमेश्वर आपणास पूर्ण सहाय्य करो अशी त्यास प्रार्थना करून हे पत्र पुरे करतों.' रा. दत्तात्रेय दामोदर, शिक्षक, हायस्कूल मुरुड (जंजिरा). “ता. २१-६ १९३७. आपण पेंडसे घराण्याचा इतिहास लिहिण्याचे मनावर घेऊन उपक्रम सुरू केलात याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच. XX पेंडशांचा इतिहास लिहावा असे माझ्या मनांत दोन वर्षापूर्वी आले होते. परंतु फुरसती अभावी तो बेत दूर पडला. आपल्या कार्यात सर्वांचे सहकार्य मिळून ते यशस्वी होवो.