पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ २] कुलबंधु काय म्हणतात २३३ परििशष्ट २ कुलबंधु काय म्हणतात । | कुलवृत्तान्त लिहिण्यास प्रारंभ केल्यापासून आम्हांस कुलबंधूकडून आलेल्या पत्रांतील कांहीं निवडक वेंचे पुढे दिले आहेत. त्यावरून अशा पुस्तकाच्या आवश्यकतेविषयीं कुलबंधूस काय वाटते हे ध्यानात येईल. या वेंच्यांचे तीन भाग केले आहेत. १ प्रथम खंड प्रकाशनापूर्वी आलेली पत्रे. २ प्रकाशनानंतर आलेली पत्रं. ३ दुसरा खंड तयार होत असल्याचे कळल्यावर आलेली पत्रे. हा दुसरा खंड समग्र लक्षपूर्वक वाचून सुचलेले विचार सर्व बंधु आम्हांस कळवितील अशी अपेक्षा आहे. १ पुस्तक प्रकाशनापूर्वी रा. हरी कृष्ण, सेवानिवृत्त सिनीअर अकाउन्टंट्, मुंबई अकाउन्टंट जनरलचे ऑफिस, ठाणे. “दि. ९-२-१९३७. केसरीमध्ये प्रसिद्ध झालेले पत्र वाचून फार आनंद झाला. XXआपण हाती घेतलेले कार्यास यश येवो एवढीच जबरदस्त इच्छा आहे. व ते काम करणाराचे हातीं आहे. उगीच परमेश्वराची आशा करण्यांत कांहीं अर्थ नाहीं.“ता. २८-५-१९३८. आपण अल्पशा म्हणून सुरू केलेल्या प्रयत्नास चांगली यशप्राप्ति होऊन कार्य पूर्ण होण्याचे पायरीस आले याबद्दल आपणास धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.' रा. सदाशिव वासुदेव, व्यापारी, कवळे-गोवा. “दि. १२-२-१९३७. उपक्रम स्तुत्य आहे. आमची इच्छा होती ती फलद्रूप होण्याची वेळ आली आहे. * ता. १६-२-१९३८. आपण फारच महत्त्वाचे काम हाती घेऊन पार पाडीत आहां हैं ऐकून फार आनंद होत आहे. पेंडसे कुलांत असे कर्तबगार मनुष्य निर्माण व्हावे अशी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. ईश्वराने आपणांस दीर्घायुष्य देऊन आणखीही महत्त्वपूर्ण काम करून घ्यावीत, रा. कृष्णाजी अनंत, गुळवेलसत्त्वाचे कारखानदार, शेकाची बिरवाडी, पो. गरें, जि. कुलाबा. “ दि. १४-२-१९३७. आपला उपक्रम फार स्तुत्य आहे. बोलाफुलाला गांठ पडावी त्याप्रमाणे मी कांही दिवसांपूर्वी सहज उद्गारलों की आमचे पेंडसे घराण्याचा इतिहास लिहिणारा कोण नाहीं कां निघे ? योगायोग असा की पंधरा दिवसांचे आंत आपला लेख वाचावयास मिळाला. रा. रघुनाथ रावजी खोत, धामणी, पो संगमेश्वर, “दि. १५-२-१९३७. घराण्याचा इतिहास लिहिण्याबद्दलचा आपला उपक्रम वाचून फार आनंद झाला.