पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-७ वें] ... सामान्य विचार २३१ सवलती देण्याचे धोरण अंगिकारले गेल्यामुळे ब्राह्मणांस सरकारी व निमसरकारी नोकरी यापुढे मिळणे-त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर-अशक्य झाले आहे. यामुळे त्यांना इतर व्यवसायांकडे उपजीविकेकरितां वळणे क्रमप्राप्त झाले आहे. - महाराष्ट्राची सध्यांची सामाजिक स्थिति लक्षांत घेतां शेती व सावकारी हे धंदे ब्राह्मणांस निरुपयोगी ठरले. आहेत. या गोष्टीचा योजनापूर्वक विचार करून त्यांनी आतां स्वतंत्र व विशेषतः शास्त्रीय शोधामुळे नवीन नवीन निघणा-या धंद्यांकडे दृष्टि वळविली पाहिजे व त्यासाठी लागणारी विशिष्ट योग्यता प्राप्त करून घेतली पाहिजे. आनुवंशिक बुद्धिमत्तेच्या जोरावर हे त्यांस साध्य होईल. नुकत्याच संपलेल्या जगड्याळ महायुद्धामुळे समाजांतील आचारविचारांत पुष्कळ फरक पडला आहे. विमान, रेडिओ इत्यादि अनेक साधनांमुळे देशांदेशांतील अंतर जवळ जवळ नाहीसे होऊन सर्व पृथ्वी एकच देश आहे असे भासू लागले आहे. परकीयांच्या राजकीय वर्चस्वामुळे आजपर्यंत या देशांतील लोकांस आपले कर्तव्य दाखविण्यास फारसा अवसर मिळत नव्हता. आतां स्वराज्य झाल्यामुळे अनेक कार्यक्षेत्रे व त्या प्रत्येकांतील अनेक दालने कर्तृत्ववान माणसास मोकळों झाली आहेत. या परिस्थितीचा योग्य तो फायदा बुद्धिमान समाजाने घेतला पाहिजे. तपाचरण, विविध शास्त्र व कला यासंबंधीं ज्ञानलालसा, सरळपणा व पावित्र्य हे ब्राह्मण्याचे विशेष गुण होत. यांच्या योग्य जपणुकीची जाणीव ठेऊन कोणताहि धंदा-व्यवसाय कोठेही स्वदेशी वा परदेशी पत्करण्यास माघार घेऊ नये. असे केले तरच योग्य तन्हेने जगतां येईल,