पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३) मॅट्रिक व मॅट्रिकच्या पुढे शिक्षण घेतलेल्या किंवा गृहकृत्याव्यतिरिक्त इतर बाबतींत लक्ष घालणा-या स्त्रियांचा समावेश या सूचीत नव्याने केला आहे. व्यकतिसूचीशिवाय ऐतिहासिक कागदांत आलेल्या व्यक्तींची सूचि स्वतंत्र दिली आहे. तसेच प्रत्येक गांवांत राहणा-या कर्त्या पुरुषांची नांवनिशी ‘निवासग्राम' या सूचींत दिली आहे. पहिल्या खंडांत एकतीस घराण्यांची माहिती आली आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पंचविसावे घराण्याचा समावेश सव्विसाव्यांत व अठाविसाव्याचा अंतर्भाव तिसाव्या घराण्यांत झाला आहे. अशा रीतीने घराण्यांची संख्या दोहोनी घटली परन्तु दोन नवीन (३२-३३) घराण्यांची माहिती मिळाल्यामुळे एकूण घराण्यांची संख्या तितकीच राहिली. पुस्तकांत छायाचित्रे देण्यासाठी पाठवावी म्हणून सर्वांना विनंती केली होती. आलेली छायाचित्रे त्या त्या व्यक्तींच्या माहितीच्या जवळ दिली आहेत. पुस्तकांतील माहिती शक्य तितकी ताजी दिली आहे; ती मार्गशीर्ष शु. १ शक १८६९ पासून आज मितीपर्यंत मिळालेली आहे. कुलवृत्तान्तलेखनाची प्रथा सुरू झाल्यास तीस पसतीस वर्षे झाली. या कालांत कोणत्याहि कुलाचा मागील माहितींत अद्ययावत भर टाकणारा दुसरा वृत्तान्त खंड प्रसिद्ध झालेला नाहीं. वाईकर सहस्रबुद्धे या एका कुटुंबाच्या वृत्तान्ताची द्वितीयावृत्ति निघाली आहे. परंतु तो सर्व कुलाचा वृत्तान्त नसल्यामुळे ते लहानसे आटोपशीर कार्य होते. आपटे यांचा कुलवृत्तान्त प्रसिद्ध झाल्यावर वीस पंचवीस वर्षांनी 'आपटे जंत्री' या नांवाचे दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत. परंतु त्यांत कांहीं व्यक्तींचीच माहिती आली आहे. सर्व कुलांतील व्यक्तींची नाही. म्हणून दुसरा खंड काढण्याचा हा आमचा उपक्रम पहिलाच आहे असे म्हणावयास हरकत नाहीं. याची रचना आम्ही आमच्या कल्पनेनुसार केली आहे. या बाबतीत पूर्वीचे कोणाचे मार्गदर्शन उपलब्ध नाहीं. पुस्तकासंबंधी पेंडसे मंडळीस काय वाटते हे त्यांच्याच शब्दांत परिशिष्ट २ मध्ये दिले आहे. इतरहि कांहीं अभिप्राय त्याबरोबर दिले आहेत. या व पहिल्या खंडांत एकत्र केलेला सर्व वृत्तान्त अनेक व्यक्तींकडन आलेल्या लेखी व तोंडी माहितीवर आणि इतर उपलब्ध साधनांवर मुख्यतः आधारलेला आहे तो शक्य तितका निर्दोष पद्धतीने येथे दिला आहे. त्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे नैर्बधिक उत्तरदायित्व (कायदेशीर जबाबदारी) संपादकावर वे प्रकाशकावर नाहीं. हे पुस्तक तयार करण्याचे कामीं श्री. गणेश पांडुरंग तथा बापूराव पेंडसे यांचे आम्हांस सुरुवातीपासून अखेरपर्यंत साहाय्य झाले आहे. हे काम यांनी निःस्वार्थ कुलप्रेमाने केले आहे. त्यासाठी प्रथमारंभीं यांचे आभार मानणे आमचे कर्तव्य आहे. नागपूरचे रावसाहेब गोविंद रामचंद्र यांनी या खंडाचे बाबतींत वेळो