पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४) वेळी उपयुक्त सूचना केल्या, माहिती मिळवून पाठविण्याचे कामी.. श्रीवर्धनचे रा. महादेव संदाशिव, काशीचे रा. मुकुंद पांडुरंग, वेरळचे रा. दिनकर श्रीराम या पेंडसे मंडळींनी तसेच आमचे स्नेही रा. गणेश बाळकृष्ण नित्सुरे, मामेबन्धु चि. जगन्नाथ वासुदेव जोशी यांनी आपुलकीने साहाय्य केले. श्री. शंकर लक्ष्मण वैद्य यांनी त्यांच्या संग्रहांतील ऐतिहासिक कागद दिले. वर्तमानपत्रांच्या संपादकांनी आमचे विनं तिपत्रास प्रसिद्धि दिली. याबद्दल आम्ही या सर्वांचे आभारी आहोत. | पुण्यातील पुष्कळ माहिती रा. दाजीशास्त्री (विष्णु विनायक) परांजपे यांनीं आणून दिली. भारत इतिहास संशोधक मंडळाचे शंकर नारायण वत्स-जोशी यांनीं ऐतिहासिक कागदांचे परिशीलन करण्याचे कामीं मार्गदर्शन केले, मुद्रिते तपासण्यांत हौत्रवेत्ते चितामणशास्त्री दातार व श्री. दि. गो. दांडेकर, अम्. के. बी. टी.यांचे साहाय्य झाले. लोकसंग्रहाचे चालकांनी कागद मिळवून दिला व पुस्तकाचे मुद्रण चांगल्या त-हेने करून दिले; याबद्दल या सर्वाचे आम्ही आभारी आहों. केसरीचे विश्वस्त, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुढारी जनार्दन सखाराम तथा तात्यासाहेब करंदीकर यांनी आमचे विनंतीस मान देऊन या पुस्तकास प्रस्तावना लिहून दिली याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. . हे पुस्तक तयार करण्यास झालेला व्यय व त्यासाठी आमच्याकडे आलेल्या पैशाचा तपशील पुढे दिला आहे. त्यावरून जमाखर्चाची तोंडमिळवणी होण्यास बरीच रक्कम यावयास पाहिजे हे लक्षात येईल. तरी प्रत्येकाने शक्य तितकी ज्यास्त रक्कम देऊन ही तूट भरून काढावी. पहिल्या खंडाचे वेळी संकल्प केल्याप्रमाणे हा दुसरा खंड प्रसिद्ध करण्याचा योग आला म्हणून जगन्नियंत्यास नम्रपणे वंदन करून हे निवेदन पुरे करतो. सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ।। मिति फाल्गुन शु। ८) शक १८७० (मातृश्राद्धृतिथि) सप्रू पुणे ग्रंथाच्या शेवटीं कोरी पृष्ठे ठेविली आहेत. त्यांवर न्यूनाधिक वृत्त लिहून ठेवावे आणि ते प्रतिवर्षी संपादकाकडे कळवावे.