पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२) ठेविली होती तिचाहि समावेश या पुस्तकांत केला आहे. या खंडात नवीन २३५ जिवंत व्यक्तींचा समावेश झाला आहे. प्रथम खंडांत दिलेल्या व्यक्ती पैकी १०० व्यक्तींच्या मृत्यूची नोंदही याच्यात आली आहे. म्हणजे जिवंत पुरुष व्यक्तींची संख्या १३५ नी वाढली असून एकूण आज जिवंत व्यक्ती १०३४ आहेत. एकंदरीत पाहतां बरीचशी म्हणजे शेकडा ८००० टक्के माहिती मिळाली असून या खंडांत अपुरेपणा थोडकाच राहिला आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं. बाविसावे घराणे सोमेश्वर-आवास यामधील मंडळींची माहिती पहिल्या खंडाचे वेळीं योग्य प्रमाणांत मिळाली नव्हती. या वेळीही त्यांचे सहकार्य लाभलें नाहीं व त्यामुळे त्या घराण्याची माहिती या खंडांतहि आली नाहीं हें नमूद करणे अवश्य वाटते. याचे उलट वारावे घराणे मुर्डी यांतील एकही अपवाद न राहातां सर्व व्यक्तींची माहिती मिळाली आहे. दुसरा खंड शक १८७०चे देवदिवाळीस प्रसिद्ध करावा असा आमचा विचार होता. परंतु अपरिहार्य अडचणींमुळे तसे होऊ शकले नाही. दुसरा खंड काढीत असल्याचे विनंतिपत्र गेल्यावर थोडक्याच अवधींत महात्मा गांधी यांचा अंत झाला व त्यानंतर महाराष्ट्रांत ठिकठिकाणी जाळपोळ इत्यादि अत्याचार झाले व देशांतील दैनंदिन जीवनास बराच व्यत्यय आला. पहिला खंड पुणे येथील अ. वि. गृहाच्या लोकसंग्रह छापखान्यांत छापिला होता तेथेच दुसरा खंड छापावा असे आम्हीं योजिले होते. हा छापखाना वर उल्लेखिलेल्या प्रक्षोभांत जाळण्यांत आला छापखान्याची पुनः जुळवाजुळव होण्यास बराच काल लागला; त्यामुळे छपाईचे काम वेळेवर सुरू करतां आलें नाहीं. व संकल्पित तिथीस पुस्तक बाहेर पडू शकले नाहीं. या पुस्तकांत माहिती देण्याची पद्धति पहिल्या खंडाप्रमाणेच ठेविली आहे. वंशावळी व व्यक्तींची माहिती निरनिराळ्या प्रकरणांत न देतां एकत्र सहाव्या प्रकरणांत दिली आहे. हे पुस्तक पहिल्या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ति नाहीं. पहिल्या वंडांत आलेली माहिती येथे पुनः उद्धृत केली नाही. फक्त पहिलो खंड प्रसिद्ध झाल्यानंतर कळलेली जुनी माहिती व त्यानंतरची नवीन माहिती दिली आहे. वंशावळींत झालेली वाढ किंवा दुरुस्ती दर्शविण्यापुरता अवश्य तेवढा भाग व्यक्तीच्या माहितीजवळ दिला आहे. सर्व वंशावळ पुनः मांडून दाखविली नाहीं. म्हणून पहिल्या खंडांतील माहितीच्या अनसंधानाने हया खंडांतील माहिती वाचणे अवश्य आहे. त्यासाठी पहिल्या खंडांतील पष्ठांक योग्य ठिकाणी दिले आहेत त्यावरून पहिल्या खंडांत माहिती कोठे आहे हे चटकन ध्यानीं येईल. पुस्तकाचे शेवटीं दिलेल्या व्यक्तिसूचींत नांवापुढे दिलेल्या दोन आंकड्यापैकी पहिला आंकडा या म्हणजे दुस-या खंडांतील पृष्ठाचा आहे व दुसरा आंकडा पहिल्या खंडांतील पृष्ठाचा आहे.