पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*****

==

== २२६ पेंडसे-कुल-वृत्तान्त [प्रकरण पूर्वी त्या भागांत सूर्योपासना घाटमाथ्यांवरील भागापेक्षा अधिक प्रमाणांत बसावी असे अनुमान-होते. देशावर सूर्याची देवळे फारच थोडीं आहेत. पेशवे दफ्तर रुमाल ४५९. इळणे या गांवचे देवास वर्षासन, सुरु सन इसने अशर मयातेन व अलफ नक्त जिन्नस श्रीगणपति ६!! श्रीअन्नपूर्णा २० ૨૨ श्रीआदित्यनाथ ६।।। श्रीलक्ष्मीनारायण १० १३।। श्रीकाळभैरव ६।।। शरीरसंबंध पेंडसे यांचे सुमारे १७५ आडनांवांच्या लोकांशी विवाहसंबंध झाल्याचे प्रथम खंडांत सांगितले आहेच. या खंडांतील बहुतेक सर्व विवाहसंबंध त्याच आडनांवांच्या लोकांशी झालेले आहेत. चित्तपावनांतील जाईल, धामणकर, भातखंडे व सबनीस हीं आडनांवें विवाहसंबंधांत नवीन आहेत. चित्तपावनाव्यतिरिक्त मोघे, माळी, नाईक, महात्मे, ताडमरी (भट) व परशुरामी या इतर पोटजातींतील ब्राह्मण घराण्यांशीही संबंध झाले आहेत. या व्यतिरिक्त कामत, मंडल, या हिदु जातीशीं व शार्प, ढालवाणी या ख्रिस्ती जातींशी संबंध झालेले आढळतात. | स. १८७४ मध्ये पेंडसे पुरुषव्यक्तीच्या झालेल्यर पुर्नाववाहाची नोंद प्रथम खंडांत केली आहे. त्याच्यापूर्वी म्हणजे स. १८६५ मध्ये मोरो रामचंद्र | पेंडसे (१०-५) यांच्या कन्येचा पुनर्विवाह झाला होता. व्यक्तिनांवें । पहिल्या खंडांत पुरुषव्यवतींत निरनिराळी १६४ नांवे आढळतात; याता १२३ नांवें विद्यमान व्यक्तींची होती. नांवे ठेवण्यांत दिवसेंदिवस अभिरुचि बदलत असल्यामुळे या खंडांत पुढील नवीन नांवे आली आहेत : अजित, अनिल, अनिलकुमार, अरुण, अशोक, आनंद, कमलाकांत, कुमार, चंद्रसेन, दिलीप, दिलीपास दिवाकर, देवदत्त, धैर्यशील, नंदू, निबराज, प्रकाश, प्रदीप, मधु, रघुवीर, रत्नाकर रमाकांत, रमेश, रविउदय, रवींद्र, रवींद्रकुमार, विकास, विजयकुमा विजयसिंह, विलास, विलासचंद्र, विश्वास, शरद, सतीश, सत्वशील, सदानंद, सिद्धनाथ, सुधीर, सुभाष, सुभाषचंद्र, सुरेशचंद्र, सुहास, हरीहर व हेमंतकुमार तसेच अरविंद, चंद्रकांत, जयंत, मनोहर, सुधाकर व सुरेश यांची संख्या खंडांतील नांवांपेक्षां वाढली आहे.