पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

rava - --- --- ७ वें]

सामान्य विचार

२२५

      • .. रामचंद्र महादेव पेंडसे यांनी राजश्री भाऊ' यांस लिहिलेली दोन पत्रे आहेत. “ भाऊ' म्हणजे “पुरुषोत्तम लक्ष्मण पेंडसे असावेत. ही पत्रे शेक १७३४ मधील कार्तिक शु.४ रविवार व कार्तिक वद्य १० शनिवारचीं अहेत. यांत तांदुळाचा भाव व तुप पाठविण्याचा मजकूर आहे. हे रामचंद्र महादेव कोण हे केळण्यास कांहीं साधन उपलब्ध झाले नाहीं. बहुधा घराणे ४ मधील रामचंद्र महादेव (५) असावेत. यांस शक १७१३ त कारकून शिलेदारीची आसामी मिळाली होती.

श्री. भास्कर रामचंद्र भालेराव, ग्वाल्हेर यांचे संग्रहांत नाना फडणीसांचे मिळकतीची जप्ती रावबाजीने केली त्या वेळची ‘समागमें मंडळी' ची छ १८ रजब सु।। समान तिसैन मया व अलफ शक १७१९ माघची यादी आहे त्यांत पुढील मजकूर आहे. यावरून राघोपंत पेंडसे, खाजगीकडील कारकून याचे घर तुपंगांवी होते हे निश्चित आहे.

  • घर तुपगांवीं आहे. त्यांची मुले माणसे कल्याणहून गणेशपंत पाटणकर, त्यांचे मामा यांनी साष्टीस पोहोंचविली आहेत.'

ऐतिहासिक कागदांची पाहाणी येथपर्यंत झाली. पहिल्या खंडांत ही पाहाणी चवथ्या प्रकरणांत ऐतिहासिक कागद दिले आहेत तेथेच केली होती. विवेचनात्मक विचार एकेच ठिकाणी असणे वाचकांच्या दृष्टीने सोईस्कर म्हणून ती या खंडांत या प्रकरणांत सुरुवातीस केली आहे. कुलांतील शिक्षण, वयोमान, संख्या इत्यादि गोष्टींची आकडेवार माहिती पहिल्या खंडांत आली आहे म्हणून ती पुनः येथे देण्याचे कारण नाही. या गोष्टीसंबंधीं कांहीं नवीन सांगता येण्यासारखे आहे तेवढे येथे देत आहों. कुलदेवता आदित्यनाथाची देवळे, नेवरे, गांवडेगुळे, सांडे-लावगन वाटद व आजगांव , येथे असल्याचे पहिल्या खंडांत लिहिले आहे. याशिवाय रत्नागिरी धामणगांव, आगरगुळे, मुरुड, सावर्डे व कुचें या गांवीं देवळे आहेत (चापे चित्पावन पृष्ठ १२९ व १५९), देवरुख तालुक्यांत आंबव या गांवीं सूर्यनारायण - देऊळ आहे. मुडी व केळशी येथील पेडसे आदित्यनाथ यास कुलस्वा या गांवाजवळच असलेल्या इळणे या गांवी आदित्यनाथाचे देऊळ असल्याचे पेशवे दप्तरांतील पुढील उल्लेखांवरून दिसते. कदाचित् हाच देव या पेंडसे वरायांचः कलस्वामी असेल. सध्या या गावी ते देऊळ नाहीं असे तपास - .. कंदरीत रत्नागिरी जिल्ह्यांत श्रीसूर्यनारायणाची बरीच देवालये आहेत. यावरून १५ प. कु. १,