पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ पेंडसे—कुल-वृत्तान्त [ प्रकरण

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

  • श्री सहस्रायु चिरंजीव राजश्री राघोपंत दादा पेंडसे मु।। पुणे याप्रति गोविंद लक्ष्मण पेंडसे आशोरवाद. येथील कुशल त।। मार्गशीर्ष शु. १३ पाये जाणून स्वकीय कुशल लेखन करावें विशेष. आपणास पेशजो पत्रे प॥ त्यांत योगक्षेमाचा वगैरे म॥र लि। आहे ते आपले ध्यानांत असेलच. त्याजविशीं मीच यावें तो कांहीं गुंत्यामुळे आलों नाहीं असो चिरंजीव रामचंद्रपंत साने तेथे आहेत ते आपणाजवळXX विनंती करतील.'

| याच संग्रहांत लक्ष्मणपंत पेंडसे यांस बाबजी महादेव पेंडसे यांनी लिहिलेले पत्रं असून लेखक लक्ष्मणपंतास आशीर्वाद लिहीत आहे. त्यावरून हे बाबजी मानाने लक्ष्मणपेक्षा मोठे असावे. घराणे १३ मधील लक्ष्मण महादेव (५) यांस बाबाजी या नांवाचा भाऊ होता तोच हा बाबजी लक्ष्मण असावा. या पत्रात । “भगवंतराव यास ॥ राघोपंतदादांनीं पत्र दिले त्यावरून निवारण दिले आहे । पत्राचे उत्तर दिले आहे ते पाहून त्याअन्वये उभयता* मन घालून याचे कार्य करून द्यावें इत्यादि मजकूर आहे. (रुमाल ६० फाईल १२-८). यावरून १३ वें व ३० वे घराण्यांतील माणसांचे हितसंबंध कांहीं बाबतींत एक असावेत असे दिसते. १३ व घराणे चौकास व ३० वे तेथून जवळच तुराड्यास होते. या पारसनीस संग्रहांत पुरुषोत्तम लक्ष्मण पेंडसे यांची १५।१६ पत्रे आमचे पाहण्यांत आली. त्यावरून हे नाना फडणवीस यांच्या पत्नी: जीऊवाई यांचेकडे जबाबदारीचे कामावर होते असे दिसते. पुण्यास राहून बाई तर्फेचा व्यवहार है: करीत असावे. यांतील बरीच पत्रे पुण्याहून मेणवलीस पाठविलेली आहेत. पत्रांचा काल साधारणत: श. १७२८ ते श. १७४३ चा आहे. हे निश्चित कोणच्या घरात ण्यांतील हे कळलें नाहीं; परंतु वरच्या परिच्छेदांत उल्लेखिलेले व नानाफडणवीस यांचे खातरजमेचे गृहस्थ लक्ष्मणपंत पेंडसे असा ज्यांचा उल्लेख ऐ. क्र. २३ मध्ये आहे त्यांचे हे पुत्र असावेत. व तसे असल्यास हे घराणे १३ मधील ६ व्या पिढीचे होत असे ठरेल. यांचे टोपणनांव भाऊ असे आढळते. बाळाजी लक्ष्मण पेंडसे याचे श. १७३६ श्रावण व. १४ रविवारचे एक पत्र । राघोपंत गोखले यांस लिहिलेले आहे. यावरून बाळाजी या नांवाचे बंधु पुरुषोत्तम पंतास असावे असे दिसते. यांची कांहीं माहिती उपलब्ध नाहीं. • जीऊबाई फडणीस यांचे नोकरवर्गात महादाजी वासुदेव पेंडसे या नांवाच एक गृहस्थ होते. त्यांची व त्यांचा उल्लेख असलेलीं कांहीं पत्रे संग्रहांत आहेत. या पत्रांचा काल शक १७३६ ते १७४४ पर्यंतचा आहे. हे घराणे ३० मधील पिढी३सुधारलेली वंशावळ पिढी ४–चे गृहस्थ होत म्हणजे वर उल्लेखिलेल्या राघ। बल्लाळचे हे पुतणे होत. "

  • लक्ष्मणपंत व राघोपंत

.:,