पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ वे ] सामान्य विचार २२३ ५**** या नांवाचा एक भाऊ असल्याचे वंशावळींवरून कळल्यामुळे राघोपंत' म्हणजे हाच रघुनाथ नानाजवळ असावा असे अनुमान करून व चौक येथील ऐकीव माहितीवरून राघोपंत म्हणजे घराणे १३ मधील रघुनाथ महादेव (५) असल्याचे आम्हीं. लिहिले. सन १९४७ मध्ये ‘पारसनीस संग्रह' यामधील नाना फडणवीसांचे कागद पहावयास मिळाले त्यांत 'राघो बल्लाळ पेंडसे' यांस इतर गृहस्थाकडून आलेली पत्रे, आढळली. त्यावरून खरे नाव राघो बल्लाळ असून घराणे १३ मधील राघो महादेव नाहीं हें निश्चित झालें. (ऐ. क्र. ८५ पहा). 1. । सन १७९७-१८०० (शक १७१९-२२) चे कालांत राघो बल्लाळ पेंडसे । या नांवाची एकच व्यक्ति होती व ती म्हणजे घराणे ३० मधील तिसरे पिढीतील होय. प्रथम खंडाचे वेळीं या व्यक्तीची कांहींच माहिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर मिळालेल्या क्षेत्रोपाध्यायांकडील लेखांवरून घराणे ३० ची वंशावळ विस्तृत झाली असून क्रमांक २८ नि ३० हीं घराणी एकत्र झाली आहेत व त्या घराण्यांत राघो बल्लाळ असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. या राघोपंताच्या पत्नी नाशिकास यात्रेस गेल्या असतां त्यांनी खालीलप्रमाणे माहिती दिली आहे. गंगाबाई भ्रतार राघोपंत बाळाजी गोविंद, दीर पांडोबा व आबा, पुतणे. विसाजीपंत व महादेव. गांव तुराडे-साष्टी. | ऐ. क्र. १७ व १८ मधील आबाजी बल्लाळ व भास्कर पांडुरंग यांस जंगलगर्क जमिनी लागवडीस. आणण्याची सनद मिळाली आहे. त्यांत या दोघांचे वास्तव्याचे गांव तुराडे असे दिले आहे. हे गृहस्थ राघोपंताचे अनुक्रमें बंधू व पुतणे होत राघोपंताचे खटपटीने त्यांस जमिनीच्या सनदा मिळाल्या असाव्या असे मानणे चूक होईलसे वाटत नाही. या जमिनी आसरोटी तार तुंगीर्तन व तुपगांव तारा वनखळ मुरंजन येथे आहेत. तुराडे गांव ता तुंगार्तन प्रांत कर्नाळामध्ये आहे. ‘पारसनीस संग्रहातील कागदांत एक पत्र वाचण्यांत आले ते ताा वनखळचे भगाजी दिनकरराव देशमुख यांनी राघोपंतास पाठविले असून कांहीं कामकाज करण्याबद्दल विनंति केली आहे. यावरून नानाजवळील राघोपंत तुराडे येथील ‘रहाणारे होत. गोविंद लक्ष्मण पेंडसे यांनी राघोपंतास लिहिलेले पत्र पुढे दिले आहे. त्यांत गोविंद लक्ष्मणाने राघोपंतास ‘सहस्रायु चिरंजीव' व 'आर्शीवाद' लिहिले आहे। यावरून गोविंद हे राघोपंताचे कोणी आप्त असून नात्याने मोठे असावेत. गोविद लक्ष्मण या नांवाची व्यक्ति घराणे ३० मध्ये आढळत नाही. तसेच इतर घराण्यांतही आढळत नाही. संशोधन क्र. २. (पृष्ठ ३६५) मध्ये ५ वे पिढींत हे नांव आढळते. यावरून या क्रमांकांतील व्यक्तींचा घराणे ३० मधील व्यक्तींशीं कांहीं संबंध असावा असे अनुमान करता येईल. (पारसनीस संग्रह रुमाल ६० फाईल १२-७.)