पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण, १२.५६, । । । । विद्वांस यांस रथावरून ओढून मारामार केली व त्याचे बंधु सदाशिवभट याचे मानेवर दगड देऊन रु. १० गुनेगारी घेतली याकरितां गणेश नारायण भट यास रु. २५ मसाला करून पुण्यास बोलाविले असल्याचे आढळते (शक १६९६ आश्विन वद्य ९. ऐ. क्र. ९९). यावरून भट यांचे भांडण पेंडसे यांच्याशीच चालू होते असे नसून खांबेटे व विद्वांस यांच्याशींहि चालू होते. यांत पेंडसे व विद्वांस यांचा शेवटीं जय झाल्याचे निश्चित कळते. खांबेटे यांचे बाबतींत शेवट कसा झाला हे समजत नाहीं. . शिवाजी महाराजांनीं आंजर्यानजीकचा किनारा ताब्यात घेतला तेव्हां तेथ विजापुरकरांतर्फे शिरके व्यवस्था पहात असत. त्यांचे वंशज तान्हाजी राजे शिरकै यांनीं आंजर्ले गांवची महाजनकी व राजवाडी आगर इत्यादि आपले ताब्यांत मिळावी म्हणून शक १७२७ मध्ये खटपट केल्याचे दिसते. त्याचा शेवट कसा झाला हे माहीत नाही. यासंबंधी दोन पत्रांच्या नकला आम्हांस पहावयास मिळाल्या त्या येथे दिल्या आहेत (ऐ. क्र. १०९-११०). असल पत्रे पहावयास मिळाली नाहीत त्यामुळे पत्रांच्या सत्यतेविषयीं कांहीं सांगता येत नाही. परंतु या पत्रांत शिरके यांनी भटास आंजर्यास आणले. शिरके हे महाजन होते ते परागंदा झाल्यावर भट आपणांस महाजन म्हणवू लागले इत्यादि मजकूर आहे. दातीर आंजल्याचे महाजन असल्याचाहि उल्लेख कागदोपत्री आहे. बाळाजी चितामणि दातीर है जल्र्याचे महाजन असा उल्लेख सवाईमाधवराव रोजनिशी रुमाल ९९-खमससबै न मया व अलफ छ १७ रमजान-मध्य आहे. नाना फडणवीस दप्तर... , * पारसनीस संग्रहांत नाना फडणवीस यांचे कागद आहेत त्यांत आठ पेंडसे यांचे उल्लेख आढळले त्यासंबंधी माहिती येथे दिली आहे. * १ राघो बल्लाळ २ बाबजी महादेव ३ लक्ष्मणपंत ४ गोविंद लक्ष्मण' ५ पुरुषोत्तम लक्ष्मण ६ बाळाजी लक्ष्मण ७ महादाजी वासुदेव ८ रामचंद्र महादेव 'खंड पहिला, पृष्ठे ४७-४८-४९-३४२-३४३-३६५ पहिल्या खंडाच्या प्रकरण ४ मधील ऐतिहासिक कागदपत्र क्रमांक २१, २२ नि २४ मध्ये नाना फडणवीस यांचे खाजगीचे कारकून म्हणून राघोपंत पेंडसे याच नांव आले आहे. त्यांत राघोपंताचे वडिलांचे नांवाचा उल्लेख नाहीं व इतर ठिका णाहूनहि हे राघोपंत कोण, कोठील यासंबंधी कांहींच माहिती उपलब्ध झाली नाहुँ। नाना फडणविसांचे खातरजमेचे गृहस्थ म्हणून लक्ष्मण महादेव पेंडसे या नांवाच गृहस्थाचा उल्लेख ऐ. क्र. २३ नि २३ अ मध्ये आला आहे. या लक्ष्मणपंतास रघुनाथ