पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* • *

सामान्य विचार २२१ ७ वें] की धान्याने शेते दिली असतील त्याची अर्धेल पेंडसे यांस देववावी व गयाळी ठिकाण त्याजकडे चालवावे. पुनः कांही दिवसांनी आंजर्लेकर रयता यांनी सुभाहून चिठ्या नेऊन शेत आगर घेतले म्हणून तसे न होऊ देण्याबद्दल आनंदराव धुमाळ यांचे रंगोपंत असवळकर यांस शक १७२३ भाद्रपद शु. २ चे पत्र गेले व त्यांजकडून केळशीचे हवालदार यांस तोच मजकूर भाद्रपद वद्य ३ चे पत्राने कळविण्यांत आला व पेंडसे यांची वहिवाट पूर्ववत चालू राहिली (ऐ. क्र. २५).इतक्या उपरहि भट स्वस्थ बसले नाहींत. ४-५ वर्षानंतर ते सरसुभा जाऊन गैरवाका एकपक्षी समजाऊन तेथून सुभास व सुभाहून तालुक्यास पत्रे नेऊन पेंडसे यांचे वतनास हरकत करविली. यावरून पेंडसे यांनी तकरार केली. त्याचा योग्य तो उपयोग होऊन सदाशिव माणकेश्वर, सुभा यांनी गेलेली पत्रे परत मागवून वतन पेंडसे यांजकडे चालू ठेवण्यास व भट यांस पुणे येथे पाठविण्यास शक १७२९ फाल्गुन शु. १५ रोजी दिनकरपंत केळकर यांस कळविलें (दिनकरपंत केळशीचे हवालदार असावेत). (ऐ. क्र. १०४). येथेच हा वाद संपलेला दिसत नाही. कारण शक १७३६ माघ शुद्ध ६ चे सदाशिव माणकेश्वर यांचे पत्रावरून पुनः मुर्डी येथील शेत व आगर अमानत करून कोट गोवाकडे वहिवाट सांगितल्याचे दिसते (ऐ. क्र. १०७). ही जप्ती पुढे केव्हां उठली । हे माहीत नाही. हा वाद ४ पिढ्या चालला. पेंडसे यांच्या खाली दाखविलेल्या पुरु-- षांची नांवें वादांतील कागदपत्रांत कोणते काळांत आढळतात ते पुढे दिले आहे. तसेच त्यांचे एकमेकाशी काय नाते आहे हे समजावे म्हणून वंशावळ दिली आहे. १ बाळाजी कृष्ण शक १६७५ माघ ते शक १६७९ २ गोविद कृष्ण शक १६८४ माघ ते शक १६९७ ज्येष्ठ ३ महादाजी बल्लाळ शक १६९६ माघ, ते शक १६९७ ज्येष्ठ ४ कृष्णाजी गोविंद शक १७१६ भाद्रपद ते शक १७२३ भाद्रपद् ५ नारो महादेव शक १७२९ ६ अनंत गोविद शक १७२९ | कृष्णाज़ी बल्लाळ. पेंडसे व भट यांजमध्ये महाजनकीबद्दल वाद चालू होता त्याच वेळेस केसो राम खांबेटे व बापूजी रघुनाथ बाळाजी गोविद " ! | भट यांचे " धर आहे ते ठिकाण " । | ... याबद्दल भांडण चालू होते. व केसो राम . महादाजी | कृष्ण . अनंत खांबेटे यास मनस्वी भाषण केले | म्हणून गणेश नारायण भट यांजपासून ].. नारो के ? रु. ५. पांच मसाला घेतला असे या कागदपत्रांवरून दिसते व तसेच मुचे । महाजनकीचे . वादामुळे मुर्डीचे उपाध्ये व धर्माधिकाँरीकृष्ण भटें बिनकेशवभट नाथ, बाळाजी ।