पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० पेंडसे-कुल-वृत्तान्त [प्रकरण - गांवांचा एक गांव केला व भटाकडे महाजनकी चालती केली. कागदपत्र हुजूर मनास आणतां गांव दोन किंवा एक हा ठराव होत नाहीं मागती सड्या घेऊन शोध करावा लागतो यांजकरितां मुर्डी अमानत करावी' (ऐ. क्र. ९८). या पत्राप्रमाणे रामाजी महादेव याने केळशीस श्रीबेलेश्वर याचे देवालयीं सड्या घेऊन शक १६९२ ज्येष्ठ वद्य ८ स पेशवे यांजकडे त्या पाठविल्या (ऐ. क्र. ५. याची शक मिति पूर्वी कळली नव्हती ती आतां मिळाली आहे). या वादांत अशा सड्यासाक्षी यापूर्वी तीन वेळां घेतल्या होत्या. पहिल्याने तुळाजी आंग्रे यांचे वेळीं, नंतर माजी महादेवाने व तिस-याने नारो त्रिंबक याने. पुण्यास हरदुजणांजवळील कागद व साक्षीदारांच्या साक्षी पहातां मुड मौजा निराळा असे ठरले व त्याप्रमाणे निकाल द्यावयाचा, तो भटांनी सांगितले कीं मौजे निराळा नव्हे येविशीचे साधनाचा कागद आम्ही आणतों तो पाहून करणे ते करावे. याप्रमाणे करार करून भट गेले व पुढील वर्षी पूर्वी पाहिलेलेच जुने कागद आणून दाखविले, नवा कागद दाखविला नाहीं; आणि घरास गेले त्यावरून रामशास्त्रीबाबा प्रभुणे यांनी श. १६९६ माघ वद्य ५ स मुर्डी गांव निराळा असा पेंडसे यांचे बाजूने निकाल दिला. याज़साठी पेंडसे यांजकडून सरकारांत नजर रुपये ४०१ घेतले. भट यांनीं दुसरें येजितपत्र शक १६९७ मन्मथनाम संवत्सरीं लिहून दिले. पहिलें येजितपत्र शक १६७५ त लिहून दिले होते. याप्रमाणें निकाल पेडसे यांस अनुकूल झाला तरी भटांनी प्रत्यक्ष वहिवाट सुरू न होऊ दिल्यामुळे पेंडसे यांस पुरंदर मुकाम पेशवे यांजकडे तक्रार घेऊन जावे लागले व त्यानंतर सुवर्णदुर्गचे मामलेदार मोरी बापूजी यांजकडून शक १६९७ ज्येष्ठ वद्य २ स गांवची सनद पेंडसे यांस मिळाली (ऐ. क्र १००). भट धटाईस येऊन मारामारीस प्रवर्ततील म्हणून त्यांस ताकीद करण्यासाठी हवालदार ताा केळशी यांस शक १६९७ ज्येष्ठ वद्य १४ स सुभाहून कळविण्यांत आले (ऐ. क्र. १०१). तथापि भटांनीं धटाईने सुभाचे ताकिदीस न मानतां पेंडसे यांस शेते लावू दिली नाहीत म्हणून गणेश रघु नाथ, बाबाजी रघुनाथ नि नारो रघुनाथ यांस हुजुर (पुण्यास) आणण्याकरिता गारदी पाठविले–शक १६९७ आषाढ वद्य ४ (ऐ. क्र. १४). याचप्रमाणे गणेश नारायण भट, कृष्णाशेट सोनार तळेकर, नि जीऊशेट बीन महादशेट सोनार यांस आणण्यास गारदी पाठवून प्रत्यकीं रु. २५ मसाला देवविला. इतक्या प्रयत्नांनंतर पेंडसे यांची वहिवाट सुरळीत चालू असतां शक १७१० ११ चे सुमारास मुरडीकर रयतावा कुळे यांस शेते लागवड करून धारा द्यावा याप्रमाणे सुभाहून चिठ्या दिल्या व गयाळी ठिकाण पेंडसे यांनी महामूर केले असता सुभाहून अमानत केले म्हणून पेंडसे यांना या सुभाचे हुकुमाविरुद्ध तकरार करावी लागली व शक १७१६ भाद्रपद वद्य ३ ला पुण्याहून मोरो बापूजी यांस पत्र गेले