पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ वे ] सामान्य विचार २१९ मुर्डीचे महाजनकीचा वाद। | पहिल्या खंडाच्या चवथ्या प्रकरणांत मुर्डीचे महाजनकीच्या वादासंबंधी ११ कागद (ऐतिहासिक क्रमांक १ ते ७, ९, १०, १४ व २५) आले आहेत. त्यानंतर उपलब्ध झालेले कागद या खंडांत ऐ. क्र. ९४ ते ११० पर्यंत दिले आहेत. त्यावरून या वादाची एकंदर तपशीलवार हकीकत ध्यानात येते ती अशीः- इ. स. १७५४* मध्ये तुळाजी आंग्रे यांचे कारकिर्दीत मुर्डी आंजर्ले वादाची चवकशी विजयदुर्ग मुकामी होऊन पेंडसे यांस अनुकूल असा निकाल झाला. (ऐ. क्र. १ शक १६७५ माघ वद्य ९). पुढे लवकरच सुवर्णदुर्ग किल्ला पेशवे यांजकडे आला. सरकार अंमल म्हणजे स्वराज्य झाल्यावर या बदललेल्या परिस्थितीची संधि साधून आंजर्लेकर भट पुनः मनसुबास उभे राहिले व धटाईने पेंडसे यांचे घर मोडावयास लागले (ऐ. क्र. १०). म्हणून पेंडसे हुजुर पुणे यासी म्हणजे पेशवे शक १६८४ माघ शु. ३) यांजकडे गेले. तेथून सुभेदारास लिहून आल्यावरून स. १७६३ जाने. १७ | त्यांचेकडून केळशीचे हवालदार यास ताकीदपत्र गेलें कीं हुजरहून निवाडा होईपर्यंत चौकीचे लोकांस ताकीद करून भट कजीया न करीत ते करणे व महाजनकी अमानत करणे. यावर भटांनी पुण्यास जाऊन कळविलें कीं नारो त्रिंबक (देशमुख) यांनी हे सुवर्णदुर्ग मुकामीं रुबरु इन्साफ करून महाजनकी व वतने आम्हांकडे सालगुदस्त सुदामतप्रमाणे चालू केली असतां पेंडसे तक्रार करितो; त्यावरून पुण्याहून वादाचा निकाल होईपर्यंत अमानत मोकळी करण्याबद्दल सुवर्णदुर्गचे मामलेदार रामाजी महादेव यांस शक १६८५ पौष शु.१४ ला लिहून गेलें व वादाची चवकशी चालू राहिली (ऐ क्र. ९६). याप्रमाणे मनसुबी चालू असतां महादाजी रघुनाथ भट सरकारची आज्ञा न घेतां पळोन गेला म्हणून त्याजपासून मसाला घेऊन त्यास व मनसुबोचे सड्या साक्षीचे कागदपत्र पुण्यास पाठविण्याबद्दल सुवर्णदुर्गचे रामाजी महादेव यांस पुण्याहून लिहुन गेलें शक १६८७ पौष वद्य ३० (ऐ. क्र. ९७). त्याप्रमाणे कागदपत्र पुण्यास पाठविण्यांत आले. ते पाहून पुण्याहून शक १६९० पौष वद्य ३० ला रामाजी महादेव यास पत्र गेलें कीं, 'तुम्हीं सरकारचे अमलांत गांव अमानत करून सड्या घेतल्या त्या उपरी नारो त्रिंबक यांनीं सड्या घेऊन दोन !

  • याचे अगोदरची म्हणजे राज्याभिषेक शक ५७ ज्येष्ठ शु. १ (इ. १७३१) ची छत्रपती शाहुमहाराज सातारा यांनी आंजर्ले येथील गण जोशी व चिंतामण जोशी बिन आदित्य जोशी यांस दिलेली सनद आहे त्यांत “ मौजे आंजर्ले' व " मजरे मुर्डी " असा या दोन गांवांचा स्वतंत्र उल्लेख आहे. यावरून त्या वेळी दोन गांव वेगळे होते असे दिसते.