पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नि वे द न कुलवृत्तान्ताचा दुसरा खंड काढण्याचे प्रयोजन हे पहिल्या प्रकरणांत सांगितले आहे. शक १८६९च्या देवदिवाळीस सर्व कुलबंधूकडे विनंतीपत्र पाठवून दुसरा खंड तयार करीत असल्याचे कळविले आणि पुढे लिहिल्याप्रमाणे माहिती पाठविण्यास व शक्य असल्यास आम्हांस एकवार भेटण्यास विनंती केली. तसेच या खंडासंबंधी कांही सूचना असल्यास त्या कळवाव्या असेही लिहिले. । (१) पहिल्या खंडांत आढळलेले दोष व त्यांचे निराकरण, शुद्धि इत्यादि (२) पूर्वी न आलेली अशी कांहीं माहिती आपणांजवळ असल्यास ती. (३) पुस्तक प्रकाशनानंतर आजपर्यंत झालेल्या कौटुंबिक घडामोडी. (अ) जन्म-विवाह इत्यादि. स्त्रियांची माहेरची व सासरची नांवे व पित्याचे नांव इत्यादि सविस्तर माहिती द्यावी. (आ) शिक्षण--पदवी-पारितोषिक इत्यादि. (इ) उद्योगधंदा-पूर्वी असलेल्यांत प्रगति व नवीन असल्यास त्याचे वर्णन. (उ) महायुद्धांत लश्करांत प्रवेश झालेल्यांची माहिती, विशेष कामगिरी नि छायाचित्रे. | वरील बाबींशिवाय पुस्तकांत यावी अशी माहिती; जुना पत्रव्यवहार, सनदा, इत्यादि. प्रत्येक ज्ञात पेंडसे व्यक्तीकडे छापील विनंतिपत्र पाठविले; परंतु वास्तव्य बदलल्यामुळे कोणास ते न मिळाल्यास कळावे म्हणून केसरी, काळ, त्रिकाळ, ज्ञानप्रकाश, सकाळ, कुलाबा समाचार, लोकमान्य, हितवाद इत्यादि वर्तमानपत्रांतून दुसरा खंड काढीत असल्याबद्दल प्रसिद्ध केले. या विनंतिपत्रास अनुसरून कांहींकडून माहिती आली. राहिलेल्यांना स्मरणपत्रे व नंतर अवश्य तेथे जोडका पाठविलीं. अशा रीतीने ब-याच जणांकडून माहिती आली. शक्य तेथे स्वतः माहिती मिळविली. पुस्तक छपाईस सुरुवात झाल्यावर भाद्रपद शु. १ शक १८७०ला पुनः सर्वांकडे पत्र पाठवून माहिती, छायाचित्रे इत्यादि पाठविण्याबद्दल विनंती केली. याचाहि माहिती मिळण्याचे काम वराच उपयोग झाला. दहा वर्षांपूर्वी वृत्तान्त प्रसिद्ध झाल्या वेळेपासून पेंडसे व्यक्तीसंबंधी जी जी माहिती आम्हांस नियत कालिकांत, इतर कुलवृत्तान्तांत व गांठीभेटीत कळली ती आम्हीं संग्रहीत करून (ए)।