पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ पेंडसे-कुलवृत्तान्त [ प्रकरण २७/५/५.०५.०५/ १२/२/ १२ , २५०/-... ** त्या वेळच्या सामाजिक समजुती व शेती यासंबंधी एक घटना पाहण्याजोगी आहे. तालुका नेवरेपैकी पुसाळे गांवच्या सखंभट पेंडसे यांनी त्याच गांवाखालील वाडा सडिये येथील आपलें घर व त्याभोंवतालची शेती करण्यासाठी सखोपंत नेने ह्यास सांगितले. अर्थात् ह्या उद्योगांत तोट्याचाच संभव फार. कारण कोंकणांत दरवर्षी घरावर नवीन शाकार-झांप, पेंढा-घालावा लागतो व अशा तृणाच्छादित घरास आगीची भीति ज्यास्त. हे जाणून दरसाल रु. १८ तोट्यापोटीं देण्याचाहि करार झाला. कराराप्रमाणे दहा पांच वर्षे नेने यांनी वहिवाटहि केली. पण त्या ठिकाणच्या भुताच्या उपद्रवामुळे नेने यास ते सोडून द्यावे लागले. इतिहासकालांत देवस्तान पडणे, भुताची बाधा होणे, भुते घालणे हे प्रकार फार. भुते घातल्यामुळे फिर्यादीहि झाल्या आहेत. त्यांतलाच प्रकार येथे होऊन नेने यांनी सांगितलें कीं भुताने घरहि जाळिलें' इतरहि फार खराबी केली, नेने यांनी खोतासहि रीतीप्रमाणे कळविलें कीं पेंडसे यांचे ठिकाण आपण सोडले व पेंडसे यांसहि सांगितले कीं ‘आम्ही जातो. ठिकाण सांभाळा.' नेने त्यांनी दुसरें शेत खंडाने घेतले व राबहि केला. 'तों आषाढ मास आला. तेव्हां खोतांनी पुढल्या सालच्या सरकार सा-याचा जामीन द्या असा तगादा नेने यांस लाविला. नेने यांजकडून तगादेवाल्याचा शिधा व खर्च घेऊ लागले. अर्थात् हे प्रकरण तेथेच न मिटता सरकार दरबारपर्यंत गेले व प्रधान बाजीराव रघुनाथ यांजकडून रीतसर बंदोबस्त झाला. त्यासंबंधीं बाजीरावाचे श. १७३९ चे पत्र ऐ. क्र. ५४ मध्ये छापले आहे. यावरून राज्यकारभार पद्धतींतील कांहीं रीती सहज कळून येतात व शेतीसंबंधींहि कांहीं माहिती ध्यानी येते. या पत्राप्रमाणे प्रथम खंड व हा खंड यांतील कित्येक पत्रांवरून हे उघड होतें कीं बैल पदरी बाळगून शेतीचों अवजारें घरीं ठेवून स्वतः अंगमेहनतीने शेते लागवडीला आणण्यापासून तों वर्षानुवर्ष सर्व प्रकारची पिके काढण्यापर्यंत सर्व शेतीचे काम कोंकणांतील वैदिक ब्राह्मण करीत. याच पत्रांत तीन बैलांची खांद पेडस यांजपासून नेने यास भरून दिली आहे. मालकाचे शेत सोडावयाचे तर मालकाबरोबर गांवखोतासहि कळविण्याची रीत होती. नवीन एखादें शेत खंडाने घेतले तर सरकारी सारा देऊ अशाबद्दल वेळीं जामीन मागण्याचीहि पद्धत होती आणि तगादा करते वेळीं तगादेवाल्याचा शिधा व खर्च ही परस्पर म्हणजे ज्याकडे तगादा करावयाचा त्याजपासून वेण्याचा परिपाठ होता. अशा कितीतरी गोष्टी हया पत्रांवरून कळून येतात. वर म्हटलेच आहे कीं हें पत्र श. १७३९ चे म्हणजे पेशवाईअखेरचे आहे. अर्थात ह्या कालांतील विवेचनाचीहि अखेर येथेच आली. नवीनोपलब्ध ऐतिहासिक पत्रे चवथ्या प्रकरणांत दिलों आहेत. - 1