पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

www ७ वें] सामान्य विचार २१७ १०nwww जबरदस्तीने ओढले गेले व कांहीं आपण होऊन अज्ञानामुळे किंवा स्वार्थ साधण्याच्या हेतूने त्यांत समाविष्ट झाले. या दोन्ही प्रकारची उदाहरणे पेंडसे मंडळींत सांपडतात. सदाशिव केशव यांचे बंधु राघो केशव हे तोतयाकडे तसदीमुळे गेले होते आणि ही त्याजवर तसदीच झाली होती. हें तोतयाप्रकरण निकालांत लागण्यापूर्वी ते अशाच कांहीं सोडवणुकीच्या गोष्टी करून परत आले होते, यावरून ठरते. पण जेव्हां ते तोतयाकडे तसदीमुळे कां होईना गेले तेव्हां त्यांचे घर जप्त करण्याचा हुकूम सुटला आणि तोतया मोडण्यापूर्वी हे राघो केशव परत आल्यामुळे त्यांच्या घराची जप्तींतून मोकळीक झाली. (ऐ. क्र. ४३) ह्या राघो केशवाकडे विजयदुर्गच्या फडणिशीकडील दप्तरदारी होती. राघो केशवाचे हे पहिल्या प्रकाराचे उदाहरण होय. दुसरा प्रकार असा–बीरवाडीकर बाळाजी हरी पेंडसे ही तोतयाचे निशाण घेऊन बीरवाडीवर आला आणि तेथील दोघे कारभारी यांस त्याने पळवून नेलें. वस्तुतः हे कारभारी बाळाजीच्या धाकामुळे त्याजकडे आलेच होते पण पुढे त्यास पळवून नेले ही गोष्ट तोतया प्रकरणानंतर उघडकीस आली. तेव्हां बाळाजीकडून ५ हजार रुपये गुन्हेगारी म्हणून वसूल करण्यांत आले. (ऐ. क्र. ५२). शिलेदारी कारकून ही आसामी वंशपरंपरा चालू राहात असे. माहादाजी राम ज्याप्रमाणे आपले वडील रामचंद्र रघुनाथ यांच्या जागीं शिलेदार कारकून म्हणून आला त्याप्रमाणे रामचंद्र महादेव हाहि आपल्या बापाच्या जागी म्हणजे महादाजी राम ह्याच्या जागीं शिलेदारी कारकून, म्हणून श. १७१३ च्या पौषांत आला. म्हणजे ओळीने तीन पिढ्या या कामावर होत्या असे दिसते. त्यास कल्याण भिवंडीच्या जकातींतून रु. १५० वेतन म्हणून देण्याबद्दल जकातीकडील अधिका-यांस हुकूम दिला आहे (ऐ. क्र. ४७). ह्याच्याच पुढल्या वर्षी म्ह. श. १७१४ मध्ये पागाफडणीसीकडील कामदार बाळाजी वासुदेव यांनी सदाशिव पेठेतील केळकर यांची जागा त्यावरील घरासुद्धा १८७५ रुपयांस खरेदी केली (ऐ. क्र. ८३). श. १७१५ मध्ये गणेशभट व चिंतामणभट यांना महिपतगड प्रांतांतून कांहीं भात व रोकड अशी नेमणूक असल्याची नोंद ऐ. क्र. ७३ च्या कागदांत आहे. मागे श. १६९७ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी श्रीवर्धन हे आपले मूळ वतनी गांव म्हणून तेथील ब्राह्मण मंडळीस कांहीं भात धर्मादाय देवविले होते. ह्या ब्राह्मणांपैकीं वेदमूत अनंतभट पेंडसे हे अग्निहोत्री होऊन काशींत राहात. तेथे भात पोचविणे शक्य नाही म्हणून त्यांना वर्षासन रु. ५० पोंचविण्याची व्यवस्था केली होती. त्यासंबंधी उल्लेख ऐ. क्र. ८४ मध्ये आला आहे. ह्याच वर्षीची दुसरी गोष्ट विशेष लक्ष्य आहे. पोतनिसी, दफ्तरदारी व फडणिशी ही सर्व कामे एकट्या बाळाजी लक्ष्मण यांनीच आपणहून मागून घेऊन चालविली आहेत. परगणे जुनी हुबळी येथील ही तिन्ही कार्ये वार्षिक वेतन रु. ३०० घेऊन चालवावी अशी सनद ऐ. क्र. ५३ मध्ये आली आहे.