पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण त्याचे निम्मे म्हणजे. रु. ५० च जावयास करार करून दिले आहेत. मागेहि अशा प्रकारचे उदाहरण घडलेलें दर्शित केले आहे. गणेश कृष्णाला ५ खंडी तांदूळ पावत होते. पण त्याच्या पश्चात् कृष्णाजी गणेशाकडे हाच दरख चालवितांना तीन खंडी कमी करून दोनच खंडी चालविण्याविषयी आज्ञा सादर झाली आहे. श. १७११ मध्ये हया कृष्णाजी गणेशास ५० बैलांवरून तांदूळ, धान्य व मीठ फिरंगाण कोंकणांतून आणण्याबद्दलची जकातीचीं दस्तके मिळत; तीच त्याचा मुलगा गणेश कृष्ण याजला फक्त ४० बैलांचीं दस्तके मिळू लागली. (ऐ क्र. ६७) ह्यावरून वारसा हक्क चालू करतांना नजराणा किंवा पूर्वीच्या देणगींत कांहीं कमी करून ती चालविण्याचा शिरस्ता असावा असे दिसते. वारसाकर किंवा डेथड्यूटी असे सध्या ज्यास म्हणतात त्याच प्रकारचा हा कर होता असे म्हणता येईल. श. १७०६ मध्ये शिलेदारीकडील कारकून पांडुरंग रामचंद्र हा मूळचा अवचितगड तालुक्यांतील रहिवासी. व यास तीन खंडी भाताची नेमणूक राजपुरी प्रांतांतून होती. अर्थात् है सोयीवार नाही म्हणून बदलून अवचितगड तालुक्यांतूनच नेमणूक मिळण्याची व्यवस्था केली आहे. मध्यंतरींची एक गोष्ट निदर्शनास आणणे जरूर आहे. रघुनाथ बाजीराव म्हणजे राघोबादादा यांची दोन लग्ने सर्वांस माहीत आहेत. तिसरेंहि लग्न त्यांचे झाले होते हे तितके प्रसिद्ध नाही. परंतु ते झाले होते हे निश्चित आहे. पेंडसे कुलवृत्तान्ताच्या पहिल्या खंडांत पृ. १९४ वर हे तिसरे लग्न प्रत्यंतर-पुराव्यासह प्रसिद्ध केले आहे. हे लग्न भिकाजी गणेश पेंडसे यांच्या मथुरा हया मुलीशीं श. १७०२ मध्ये दादा सुरतेस इंग्रजाकडे असतांना झाले. हया भिकाजींचे बंधु बाबाजी गणेश म्हणजे राघोबादादाचे चुलत सासरे यांचा उल्लेख (ऐ. क्र. ५०) श. १७०४ च्या पत्रांत आला आहे. त्यांजकडे दादासाहेबांचे चिरंजीव बाबासाहेब म्हणजे दुसरे बाजीराव हे कोपरगांवीं भोजनास गेल्याची नोंद आप्पाजी राम सहस्रबुद्धे यांच्या पत्रांत आली आहे. राघोबादादा व पुण्यातील कारभारी मंडळी (बारभाई) यांचा शक १६९६ चे सुमारास जेव्हां बेबनाव झाला त्या वेळी राघोबादादांचे पक्षाच्या मंडळीची धरपकड व मिळकतीची जप्ती कारभारी मंडळींनी केली. त्यांत सदाशिव भिकाजी (७-५) यास हा राघोबांचे पक्षाचा म्हणून कैद व घराची जप्ती झाल्याचे दिसते. (ऐ. क्र ९०). यावरून सदाशिव पेंडसे यांचा ऋणानुबंध राघोबाशीं मथुराबाईचे लग्नापूर्वीपासून असावा. या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणूनच की काय पुढे श. १७३८ मध्ये यांस रावबाजीने फुलगांवीं घर बांधण्यास दोन हजार रुपये दिले. पेशवाईच्या उत्तरार्धामध्ये तोतया प्रकरण चांगलेच गाजलें व अनेकांना त्या प्रकरणाने गांजले. त्याची झळ हया पेंडसे कुलालाहि लागली. कांहीं ह्या प्रकरणांत