पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

***

७ वें] सामान्य विचार । २१६ ००००००००००००००.... . भावास म्हणजे नारो कृष्ण यास चाकरीस घेतले होते म्हणजे नांव गोविंद सदाशिवाचे पण चाकरी प्रत्यक्ष नारो कृष्ण याजकडे असे. ह्या मंडळींची माहिती नवीनच उपलब्ध होत असून त्यांचा अंतर्भाव घराणे ८ मध्ये होतो. (ऐ. क्र. ५१). यानंतर घामापुरच्या केसो रघुनाथाचा उल्लेख श. १६९५ चा येतो. हां गांव संगमेश्वर तालुक्यांतील असून त्यावर प्रतिनिधींची सत्ता असे. या वेळी श्रीनिवास गंगाधर ऊर्फ भवानराव हे प्रतिनिधी पदावर होते. या प्रतिनिधींनी केसो रघुनाथच्या पाटपाण्यास गणोबा व कृष्णंभट हे कलह करून अडथळा करतात तो करू न देण्याबद्दल बजाविले आहे. वर जसे तिघेहि सख्खे बंधू निरनिराळ्या परगण्यांत फडणिसी वा मुजुमदारी करीत असल्याचे आले आहे त्याप्रमाणे अवचितगड येथील दफ्तराकडील कारकुनीची आसामी महादाजी रघुनाथ यांची होती पण त्यांचे बंधू आबाजी हेहि ह्या कामावर नियोजित केले जाऊन त्यास रु. १५० ची नेमणूक करून दिली आहे व ही गोष्ट श. १६९६ सालांतील अहे. हयाचे वर्षांची म्हणून येथेच सांगून टाकावयाची दुसरी किरकोळ गोष्ट ही की नाशिकाच्या दुतोंड्या मारुतीस प्रदक्षणा घालणा-या ब्राह्मणांत एक भिकंभट नाशिककर पेशव्यांच्या रोजकोर्दीत निर्दिष्ट आहे. श. १६९७ मध्ये श्रीवर्धनकर ब्राह्मणांस राजपुरी महाल.. पैकी कुटुंब पाहून कांहीं खंडी भात देण्याची जी व्यवस्था केली होती ती मध्यंतरी बिघडल्यामुळे ती पुनः पूर्ववत् चालू राहावी म्हणून चिमाजी माणकर यास सनदपत्र दिले आहे. त्यांत महादेवभट व बाबाजीभट यांची नांवे आली असून हया नांवांपुढे चांगबोले ह्या शब्दाची जोड दिली आहे. सरकारी कागदपत्रांत पेंडसे यांस “चांगबोले' म्हणून संबोधिल्याचा हा पहिलाच उल्लेख आहे. चांगभलेचे चांगबोले होणे शक्य आहे व ह्यांतील चांग आणि बोले हे दोन्ही शब्द शुद्ध मराठी व रूढ आहेत. तरी या दोहोंचा झालेला एक शब्द हा मात्र श्रुत नाहीं. तात्पर्य, हा शब्द विचारांत घेण्याजोगा आहे. चांगबोलेच्या सादृश्याने गोडबोलेचे स्मरण होते. यापुढील उल्लेख श. १६९९ मधील असून नारंभट असा त्यांत नाम: निर्देश आहे. नारंभट हे नारायणभटाचे लघुरूप आहे. याच नारं किंवा नारायण भटाचा उल्लेख श. १६४३ मध्ये हि मागे आलेला सांगितला आहे. व तो खेड (सव दर्ग) येथील राहणाराचाच आहे. दोन्ही उल्लेखांतील अंतर ५७ वर्षांचे आहे व तें कालदष्टया अशक्य नाहीं. पहिल्या उल्लेखाचे वेळीं हया नारायण भटांस पंडित असे संबोधिले आहे. त्या कालीं पंडित म्हणण्याइतके अध्ययन नारायणभटांचे झालेले असण्यास व त्यानंतर ५७ वर्षांचा आयुर्दाय धरावयाचा म्हणजे या दुस-या उल्लेखाचे वेळीं नारंभटाचे वय सत्तरऐंशीच्या घरांत गेले असण्याचा संभव आहे. मात्र येथे त्यास नुसते वेदमुतच म्हटलेले आहे. हयानंतर श, १७०५ मध्ये गुंडभट महादेवभट यांस-हे नरसीपुरचे राहणारेत्यांच्या सास-याचे वर्षासन मिळाले आहे. मात्र सास-यास १०० रु. मिळतं तर