पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ पेंडसे कुलवृत्तान्त [प्रकरण कालानुक्रमाने निरनिराळे लहान मोठे अधिकारी कोण कोण झाले ते साकल्येकरून सांगावयाचे आहे. . .. । श. १६४३ मध्ये कार्ले यांचे देशकुलकर्णीपणाबद्दल निवाडपत्र झालेलें उपलब्छ आहे. (ऐ. क्र. ७२). त्यावर पंडित, वास्तव्य खेड व महाजन वास्तव्य केळशी ही पदवी लावलेले दोन पेंडसे पुरुषांच्या साक्षी आहेत. श. १६५९ मध्ये ६२ मंडळींना मिळून ४६ बिघे जमीन शेती करण्यासाठी दिल्याचे एक पत्र (ऐ. क्र. ८०) मिळाले आहे. त्यांत तीन पेंडसे व्यक्तींकडे चार बिघे जमीन सोंपवून ह्या जमिनीचा आकार धर्मादाय लिहिण्याबद्दल नानासाहेब पेशव्यांनी फर्माविले आहे. हा देणगी परगणे नसरापूर प्रांत कल्याणपैकी कोठिंबे व त्याजवळच्या गांवांतील आहे. विशेष कीं, ह्या देणगीच्या स्वीकाराबरोबर त्या बासष्ट मंडळीकडे याच बाजूच्या 'पड जमिनींपैकीं अनुकूल पडेल तेथे शेती करण्याबद्दलचे हि काम सोपविलेले आहजमीन लागवडीस आणणे हेंहि काम त्या काळी चालू होते व ते काम वैदिक ब्राह्मण करीत हे यावरून ध्यानीं येते. पण श. १६५९ मध्ये दिलेला हयासंबंधी कागद श. १६७० मध्ये जीर्ण झाला असे म्हणून पुनः सनद दिली (ऐ, क्र. ८१) है चित्य वाटते. कारण ११ वर्षांतच इतके जीर्णत्व कां यावे समजत नाही. काला नुक्रमाच्या दृष्टीने ह्यापुढील कागद श. १६८३ मधील आहेत. पण ते मुर्डी-आंजल ह्या वादप्रकरणातील असल्यामुळे व तो वाद स्वतंत्रच सांगणे इष्ट असल्यामुळे त्या कागदांसंबंधी विवेचन येथे न करता पुढे केले आहे. म्हणून इतर कागदाविषयीं येथे विचार करू. पेंडसे कुलांतील मंडळी ऐतिहासिक कालांत मुख्यतः दोन व्यवसाय करणारा अधिक प्रमाणात आढळतात. एक निपिकी जमीन पिकाऊ करणे आणि राजकार भारापैकीं लेख्यशालेकडील म्हणजे दफ्तरदारीकडील काम करणे. इतर व्यवसाय त्या मानाने कमी. उदा० अग्निपूजक म्हणजे अग्निहोत्री घराणी थोडीं. मौजे कोठिब ह्या एका गांवीं तीन अग्निहोत्री असून त्यांना प्रत्येकी थोडी जमीन दिली आहे. (ऐ. क्र. ८२). पण फडणिशी शिलेदारीकडील कारकून, मुजुमदारी, पोतनिसी ही काम करणारे अधिक आहेत. तालुका शिवनेर खालील साडे तीन तर्फ मावळ भाग आहे. तेथील फडणिशी करणारे लक्ष्मण विश्वनाथ हे असून त्यांना प्रतिवर्षी २०० रु. चा तैनात दिलेली आहे (ऐ. क्र. ४१). पुढे तीन वर्षांनी म्हणजे श. १६९७ च्या पषित ह्याच लक्ष्मणपंताकडे मुल्हेरकडील कमाविसी सोंपविली आहे. (ऐ.क्र. ४२). सदाशिव गणेश याचे तिन्ही मुलगे विश्वनाथ, महादाजी व गोविंद यांजकडे अनुक्रमें बीरवाड़ा तालुक्यांत सुभ्याची फडणिसी व महालची मुजुमदारी; राजपुरी प्रांतापैकी त मांडल्याची मजुमू आणि परगणे कोडील येथील मजुम् असे अधिकार व कामे असून हचांस १४५।।।, ४७ व २७०. अशी वेतनाची रकम मिळत असे. हयांतील गोविंद रावाकडे सर्व कोडील परगण्याची मजमदारी असल्यामुळे ह्याने आपल्या चुलत