पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*****

७ दें] सामान्य विचार २१३ wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww" ह्याचा अर्थ आज़ फार गौण समजला जातो. तसा अर्थ तेव्हां नव्हताः उघड उघड जे पैसे काम केल्याबद्दल मिळत त्यास कारकुनी ही संज्ञा होतीः सरकारदरबारी सरकार कामासाठीच केवळ कारकून असत. आजच्याप्रमाणे सर्व सामान्य नागरिः कांचा व राजसत्तेचा निकट संबंध येत नसे. म्हणजे जो. आपला कारकून नाही पण काम मात्र त्याजकडून करून घ्यावयाचे आहे अशा स्थितीत त्या कारकुनाला कांहीं पैसे उघड व सरळ रीतीने देणे इष्ट व अवश्य असे. आणि असे पैसे देणे घेणे हे राजमान्य व लोकमान्यहि समजले जाई. म्हणून सरकारी हिशेबी कागदांत ह्या कारकुनी रकमेची नोंद न्यायतःच होई. असो. एकंदरीत गणेश कृष्ण व त्याचे पुत्र कृष्णाजी गणेश व त्याचेहि पुत्र गणेश कृष्ण यांजकडे खरगोण, अंतर्वेद, हाडे, राजपुरी, कल्याण, इटावा, बलसाड, पारनेर, दसकुरई ( गुजराथ ), सकुराबाद, फपुंद, खोपी, विसापूर, कागू, भिलवलें, कासरोली, नवोढ, दंडास ( अहमदाबाद ), शहापूर-अकदापूर, गंगापूर, नाशिक, भूतसर, बोहारी, जुन्नर, अवचितगड, ह्या ठिकाणांतून फडणिसी म्हणून, मजमूदारी म्हणून, मामलत म्हणून व दप्तरदार म्हणून कोठे जकातीचे उत्पन्न, तर कोठे महालच्या किंवा गांवच्या उत्पन्नाचाच कांहीं भाग, कोठे खाजगीतून गुरांना गवत, कडबा, तर कोठे जकातीचीं दस्तके मिळत. तसेच सरकारी खर्चाने मशालजी व दस-याचे कापड मिळे. ही कामगिरी व त्यासंबंधींची मिळकत ह्याची स्वतंत्र नोंद असलेले कागद तर मिळालेच आहेत. पण एकत्रित यादीहि उपलब्ध झाली आहे. व ती ऐ. कागदपत्रांत (ऐ. क्र. ६६) वर दिली आहे. हे सर्व कागदं शर्क १६७६ व श. १७३२ या कालमर्यादेतील आहेत. शिबंदीची वाटणी, महालांची वाटणी वगैरे कुल काम या कृष्णाजी गणेशकडून घ्यावे असाहि उल्लेख सांपडतो. यावरूनहि फडणिशीचे दोन प्रकार व त्या दोन्ही फडणिशींकडील दफ्तरदारीचे काम ह्या घराण्याकडे असे, असे दिसून येते. हया पेंडशांची सदाशिव पेठेत जागा होती. ती गाडद्याकडील कारकून ‘घांगरेकर व रामाजी कोन्हेर आणि दफ्तराकडील कारकून नारो गणेश लिमये हया तिघांनी ४३४३ रुपयांस श. १७२१ च्या आश्विनांत विकत घेतली. त्या वेळची पद्धत अशी होती की, खरेदी देणार-घेणारांचे खरेदीपत्र झाले तरी ते पाहून कोतवालने एक 'कबालेपत्र' द्यावयाचे व ‘कबाल्या' चा व शेल्या' चा आकार घेऊन कोतवालानें आपलें पत्र द्यावयाचे म्हणजे तो व्यवहार पूर्ण होत असे. प्रस्तुत व्यवहारांत हा कबाल्याचा आकार निमा माफ केला आहे व शेल्याचा आकारहि हिशेबी खर्च लिहावा असे सांगितले आहे. . . पेंडसे कुलांतील शिवकालीन व्यक्तींविषयीं व शिवोत्तर कालांतील पुण्यनगरीतील प्रमुख व्यक्तीविषयीची माहिती आज उपलब्ध झालेली वर दिली. आतां