पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२: पेंडसे-कुलवृत्तान्त [प्रकरण सर्व दप्तरदारीच्या कामाचा सर्वश्रेष्ठ व मुख्य एक अधिकारी कोण तर फडणीस. ह्या फडणीसीमध्ये दोन प्रकार. एक स्वारी फडणीस व दुसरा दरबार फडणीस. ह्यांतहि दरबार फडणीस प्रमुख, स्वारी फडणीसचे दप्तराला ' चालतें दप्तर' असे दुसरे नांव आहे. चालतें दप्तर म्हणजे चालू दप्तर हा एक अर्थ आहेच. आणि मुख्य फडणीसाच्या दफ्तराला एकबेरजी दप्तर हे दुसरे नांव आहे. स्वारी फडणीसाने आपले सर्व काम, हिशेब व कागदपत्र मुख्य दरबार फडणीसाकडे सुपूर्द करावयाचे असत. ह्या फडणीसी कामांतीलच एक भाग मजमू दप्तर हा आहे. अंतर्वेद प्रांतांतील : मजमू ही ह्या गणेश कृष्णाजीकडे म्हणजे कृष्णाजी गणेशच्या बापाकडे होती. व ती ‘दिमत बाळाजी जनार्दन व मोरो बाबूराव फडणीस' अशी होती. वर जे । फडणीशीचे दोन प्रकार सांगितले तेच ह्या ठिकाणच्या दोन नांवांनी लक्षांत । घ्यावयाचे आहेत. म्हणजे बाळाजी जनार्दन हे दरबार फडणीस व मोरो बाबूराव स्वारी फडणीस होते. असो. ह्या कृष्णाजी गणेशाला अंतर्वेदींतील मुजुमदारीबद्दल वर्षाला दोन सहस्र रुपये वेतन मिळत असे. पण श. १६९५ पासून त्या महालच्या जमा होणा-या वसुलाच्या प्रमाणांत येतील तसे रुपये द्यावेत असा नियम केला. म्हणजे थोरले माधवरावांचे कारकीर्दीत अंतर्वेद महालचा वसूल जितका येत असे. तितका त्यानंतर येईनासा झाला म्हणून वसुलाच्या प्रमाणाशीं मजमूच्या मिळावयाच्या वेतनाचे प्रमाण ठरविणे भाग झालें. कृष्णाजी गणेशाकडे परगणे इटावा, परगणे सकुराबाद, परगणे फपुदे येथीलहि मजमूचे काम होते. व त्याबद्दल अनुक्रम ९००, ७०० व ४०० अशा रकमा मिळत. तसेच विसापूर तर्फ (प्रांत कल्याण) येथील फडणीस विसाजी नारायण तोतयास मिळाल्यामुळे ही फडणिशीहि कृष्णाजीकडे आली. तोतयाचा शेवट इ. १७७६ मध्ये झाला. पण त्याला सामील झालेल्यांना शिक्षा देण्याचे काम चालू झाले व त्यांत हा विसाजी नारायण असल्याचे आढळून आल्यामुळे त्याला त्याच्या फडणिशीवरून काढून टाकले व ती फडणिशी : कृष्णाजीपंतास दिली. ह्या फडणिशीचे वेतन वर्षास रु. ५० असे. (ऐ. क्र. ६३), कृष्णाजीपंतास फिरंगाण कोंकण तसेच इंदापूर, बारामती, व खोपी (खेडेबारें) येथून तांदूळ अगर इतर हर जिन्नस १० खंडीपर्यंत आणतील त्याचा जकातीचा आकार मुशाहिन्यांत धरण्यास सांगणारी दस्तकेंहि पुण्याचे त्या वेळचे सुभेदार जनार्दन : आपाजी खिरे, तुळशीबागवाले यांजकडून स्वारी राजमंडळाच्या दप्तरांतून मिळाली आहेत, तसेच पेशवे यांच्या खासगी गंजीपैकी २००० पेंढ्या गवत प्रतिवर्षी ह्यास मिळत असे. यावरून पेंडसे कुलापैकीं ह्या कृष्णाजीच्या घराण्याचा पंतप्रधान पेशवे घराण्याशी आपलेपणाचा व घरोब्याचा भाग असावा हे दिसून येण्यास अवसर सांपडतो. कृष्णाजीस कोंकणांतील नातूपालवण तर्फपैकीं मौजे कागू या गावातूनहि गाँव उत्पन्नांतील रु. १२०।। आणि एक खंडी भात (रु. २०) मिळत असे. पैकी रु. २० कारकुनीचे म्हणून सांगितले आहेत. : कारकुना