पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

००० , ७ वे ] । सामान्य विचार २११ ~ wwwwwwwwwwwww दिमतींत आहे. त्याचप्रमाणे अहमदाबाद परगण्यांतूनहि असेच रु. २०० गणेश कृष्णांना मिळावयाचे आहेत. ह्या अनेक ठिकाणीं गणेश कृष्णाचे मार्फतच तेथील दप्तरी कामावर लेखक नेमले जात असत. व त्यांना ही रकमेची पोंच व्हावयाची असे. गुजराथेत बलसाड प्रांताचीहि दप्तरदारी यांजकडे होती. अहमदाबादकडे महादाज़ी नारायण म्हणून गणेश कृष्णाकडील कारकून नेमला गेला होता. कारकून ह्याचा अर्थ येथे मामलत करणारा कारकून असा आहे. कारण यापूर्वीची म्हणजे श. १६७७ च्या आधींची अहमदाबादची मामलत दामोदर महादेव व देवराव महादेव या हिंगणे बंधूच्याकडे होती. पण आतां ती त्यांजकडून काढून गणेश कृष्ण यांच्या निसबतीच्या महादाजी नारायण याजकडे दिली असे स्पष्ट सांगितले आहे (ऐ. क्र. ५७). ह्यावरून गणेश कृष्णाचे तर्फ बन्याच ठिकाणचे कारकून म्हणजे मामलतदार नेमले जात; एवढा अधिकार त्यांचे दप्तरदारींत अंतर्भूत होता असे स्पष्ट ध्यानांत येते. गंगायमुना ह्या दोन नद्यांमधील म्हणजे अंतर्वेदी प्रांताची मजमूहि गणेश कृष्णाचेकडे होती. आतांपर्यंत गणेश कृष्णाचे बाबतींत त्याची कामगिरी सांगणारे उल्लेखच देत आले; आतां त्याला होणा-या प्राप्तीचे उल्लेख मिळाले ते दशित करावयाचे आहेत. अर्थात् हया उल्लेखांबरोबर त्याचे काम कोटे कोठे झालेले आहे ते सांगावयाचे आहे. श. १६७७ मध्ये राजपुरी महालपैकीं पूर्वीप्रमाणे २ खंडी आणि नवी देणगी म्हणून ३ खंडी असे आणखी ५ खंडी तांदूळ बारीक, राजपुरीचे अधिकारी राणोजी बलकवडे यांजकडून यास नानासाहेब पेशवे यांनी देवविले. या ठिकाणी तांदुळाचे माप सांगतांना ‘साडे तिसरी कैली खंडी' असे म्हटले आहे. म्हणजे वीस मणाची खंडी हे प्रमाण. तसेच मण किती पायलींचा; तर केली, म्ह. बारा: पायलींचा. पण पायली “ साडे तिसरी ?' असे सांगितले आहे. साडे तिसरीप्रमाणे छशे; नवशेरी किंवा कोठी मापं असें ह्या संबंधांत अन्यत्र पायलीचे प्रमाण ..-: आलेले आहे. | कृष्णाजी गणेश हा गणेश कृष्णाजीचा मुलगा आपल्या बापाच्या जागीं। दप्तरदार म्हणून आला. हा बापाच्या हयातीतही कोठे कोठे हे काम करीत असे. बापाच्या जागीं बापाच्या पश्चात् तो कामावर आला तेव्हां बापास मिळणारें सर्व उत्पन्न यास न मिळतां कांहीं उत्पन्न कमी झाले. प्रांत राजपुरीपैकी ५ खंडी तांदूळ मिळत; ते आतां २ खंडी मिळू लागले. गणेश कृष्णाजीकडे जो दप्तरदारीचा अधिकार होता तो, असे वाटते की, सर्व मराठे राज्यांतील दप्तरदारीचा होता. हया वा हा तर्फ उंदेरीचा अधिकारी होता व तर्फपेक्षा तालुका हा लहान असल्यामुळे उंदेरी वगैरेंचाहि तो अधिकारी होता. सवाई माधवराव रोजनिशी भाग १, २ पृ. ७४, १२, २८५