पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

܂ ܕ ०००, पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण म्हणजे वणोशी येथे जावे लागले. अर्थात सरकार पक्षाची अवकृपा झालेल्या ह्या साबूरावास " कोठे फंदफितुर करणार नाहीं अशा करारावर व त्याबद्दल जामीन देऊनच आपल्या गांवीं राहावे लागले आहे. पण ह्यांतहि हे लक्षांत घेण्याजोग आहे कीं, ह्याचे वणोशी गांवचे खोतीचे वतन-त्या वतनाचा भोगवटा हा बाबूराव पुण्यास असल्यामुळे तुटला होता तरी–पुनः पूर्ववत् चालू केले आहे; वृत्तिच्छेद केला दाहीं. इतकेच नव्हे, तर, बाबूराव यास कांहीं कर्ज होते त्याबद्दलहि ‘कर्जदारांस तगादा करू न देणे. सोइसोईने ते पैक्याचा निकाल करतील' असा काळजीच्या व आपलेपणाच्या दृष्टीनेच त्याचा बंदोबस्त करून ' खोतीचे कामकाज ह्याचेच होते. घेत जाणे' असेहि ह्या हुकुमत बजाविलें आहे. - वर आलेच आहे कीं, वणोशी येथील खोती वतन ह्या बाबूराव राम याचे भरण्याकडे पूर्वापर होते; पण बाबुरावाच्या पंधरा सतरा वर्षे पुण्याच्या वास्तव्यामुळे ह्या वतनाच्या हक्कांत इतरास हात घालण्यास अवसर मिळाला व ती जी कदां भांडणास सुरुवात झाली ती पुनः पुनः अधून मधून चालूच राहिली. हया दादाचा निर्णय सर्व प्रकारच्या साक्षीपुराव्याने श. १७०३ मध्ये यथास्थित लागला असतां शं. १७३२ मध्ये बाबुरावाचा मुलगा मोरोपंत ह्याचे वेळी हा तंटा पुनः सुरू झाला व वतनाची जप्तीहि सरकारांत झाली. या तंट्याचा निर्णयहि पुनः पेंडसे यांच्याच बाजूने झालेला आहे. हे प्रत्यक्ष भोगवट्यावरून ध्यानीं येते. इ. स.१८१०; नंतर लवकरच हे भांडण संपलें व बाबूराव राम ह्यांच्या वंशजाकडे हैं स्त्रोत्रो वितन पूर्ववत् चालू झाले. पण त्यानंतर बहुधा ह्या वादापायीं झालेल्या खर्चामुळे हे खोती वतन बाबूराव रामाच्या वंशजास श. १७५७ च्या सुमारास गहाण टाकावे लागले. सध्या ते अन्य घराण्याकडे चालू आहे. ।। ३; गणेश कृष्ण हे 'पेशवे सरकारी दप्तराचे आद्य प्रस्थापक होत. ह्यांचे संबंधाने पहिल्या भागांत आलेल्या माहितीत पुढील भर घातली पाहिजे. तेथे सांगितलेंच आहे कीं स्वारी दप्तर, चलते दप्तर, एकबेरजी दप्तर, कोणचेंहि प्रमुख दप्तर म्हटले की त्याशी ह्यांचा संबंध असावयाचाच. त्यामुळे यांना निरनिराळ्या प्रांतांतून त्या त्या बाजूचे ' स्वारी कारकून म्हणून रक्कम मिळत असे. रघुनाथराव दादांचे बरोबर हे स्वारीवर असतांना अशांपैकी सरकार खरगोण व सरकार होडे येथून रु. २०० करार करून ह्या दोन्ही सरकारचे कमाविसदार नारो बल्लाळ भेसकुटे यांजकडून यांना देवविले आहेत. विशेष हें कीं, हे रुपये सरकारचे मक्त्याशिवायचे आहेत. म्हणजे आधी ठरलेल्याखेरीज हे रुपये मिळावयाचे आहेत व ह्या संबधीची सनद त्या प्रांतांतल्या सरदारांच्या* म्हणजे गणेश खंडाजी खांडेकर यांच्या

  • प्रांतांत अधिकारी तीन. एक मुख्य फौजबंद सरदार, नंतर वसूली अधिकारी कमाविसदार आणि तिसरा लेखकाधिकारी दप्तरदार.