पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्य विचार २०९ ..... ती देणे हेंहि ह्या ग्रंथाचे कार्य असते. अर्थात् त्यासाठी संशोधन सारखें करीत राहिले पाहिजे हे जे सांगितले जाते ते कसे आवश्यक आहे ते निराळे -सांगणे नको. पहिल्या पुस्तकांत इतिहासकालांतील म्हणून जो पेंडसे व्यक्तीचा पहिला उल्लेख दिला होता तो थोरले बाजीराव पेशवेकालीन होता. आतां सन १६९७ चा म्हणजे त्यामागील ३०॥४० वर्षांचा उल्लेख उपलब्ध झाला आहे. तो येथे प्रथम द्यावयाचा आहे. शिवाजीमहाराजांचे तिसरे जामात ज्या महाडीक घराण्यांतील त्या महाडीक घराण्यांतील माणकोजी यांजकडून पुरोहितपणाबद्दल प्रतिवार्षिक संभावना म्हणून रु. १२ पेंडसे घराण्यांतील वैदिक़ महादेवभट आणि बाळकृष्णभट यांस मिळावयाचे असे स्वतः राजे माणकोजीनीं लिहून दिलेले आहे. (ऐ क्र. ७६-७७ पहा.) हे माणकोजी शिवाजीचे जावई हरजीराजे यांचे किती जवळचे आप्त होत हे महाडीक यांची पूर्ण व विश्वसनीय वंशावळ न मिळाल्यामुळे सांगता येत नाही. पण ज्या घराण्यांत हा कागद उपलब्ध झाला ते तारळ्याचेच महाडीक होत व त्याच घराण्यांतील हरजीराजे महाडीक हे असल्याचे प्रसिद्ध व निश्चित आहे. ह्याच घराण्यांत पुढे पुनः शाहूची बहीण म्हणजे, शिवाजीची नातः भवानीबाई ही दिली होती. भवानीबाईचा पति शंकराजी राजे हा जसा औरंग-.. जेबाच्या नोकरीत होता तसाच हा माणकोजीहि ह्या वेळीं दिल्लीक़र मोंगलांचाच नोकर होता व म्हणून वरील देणगीच्या पत्रावर आलमगीरचा शिक्का आहे. वरु सांगितलेल्यांपैकीं बाळकृष्णभट पेंडसे यांस प्रतापजी राजे महाडीक यांनी ह्याच वर्षी दुसरें एक दानपत्र दिले आहे. आणि त्यांत इंदापूर परगण्यांतील कसबे बावडे येथील चाहूरभर जमीन 'जो परियत जहागीर आहे तो परियत तुम्ही कीर्द करून सुखे असणे' असे सांगून दिली आहे. हे दान देणारा प्रतापजी राजे महाडीक हो । शिवाजीचा नातू म्हणजे हरजीराजे यांचा मुलगा होय. ह्यावरून माणकोजी हो, याच महाडीक घराण्यांतील व जवळचा आप्त असावा असे म्हणण्यास हरकत नाहीं. शिवोत्तर कालांतील पण पुणे राजधानीशीं संबद्ध अशा व्यक्तींची माहिती पाहं. प्रथम पुण्याचे कोतवाल बाबूराव राम व नंतर पुणे राजधानीचे दप्तरदा. गणेश कृष्ण यांचे संबंधी जी नवीन माहिती मिळाली ती अशी | बाबराव राम ह्याचे मूळ नांव रघुनाथ राम असे आहे. पण हा पण्य नाव चुनाव में असह. पण हा पुण्याचा. कोतवाल असल्यामुळे व पुण्याचा कोतवाली ही ऐतिहासिक काल प्रतिष्ठेची व अधिकाराची जागा असल्यामुळे बाबूराव या टोपण नांवानेच त्यास लवले जाई. त्याचा निदरा पहिल्या खंडात योग्य स्थळी । ,,, टे. पण्यास असतां सवाई माधवरावाच्या राजवटीत जो अधून " मयन धा १४ प. कु. व. जपरी माजत असे त्यांत हयाजवर काही टपका यऊन ह्यास आपल्या मळे दी ।