पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें सामान्य विचार ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख, संशोधनार्थ आणि वंशावळी व माहिती या तीन प्रकरणांत आलेल्या माहितीवरून सुचणारे कांहीं विचार येथे देत आहों. • ऐतिहासिक कागदांची पाहाणी आकाशांत तारा हा स्वतःभोवती फिरत असतांहि तो दुस-या ता-यांभोंवतीं फिरतच असतो आणि त्याच्याहि भोंवतीं आणखी इतर ता-यांचे फिरणे चालूच असते. म्हणजे इतका या परस्परांत ज्याप्रमाणे वेगळेपणा असूनहि मूलतःच दृढ असा संबंध आहे त्याप्रमाणेच इतिहासाच्या नभोवितानांत व्यक्तीचे घराण्याच्या व समाजाच्या इतिहासाशी म्हणजे पर्यायाने प्रांतीय व राष्ट्रीय इतिहासाशीं दृढ नाते आहे. व्यक्तीच्या वा घराण्याच्या इतिहासाला त्याचे म्हणून मूळचे, अंगचे असे कांहीं महत्त्व व स्थान आहेच. पण ते तेथेच संपते असे नाहीं; तर त्या इतिहासाची सामाजिक व राष्ट्रीय इतिहासालाहि आवश्यकता आहे आणि म्हणूनच ‘‘ लोकगर्भगहं कृत्स्नं यथावत् संप्रकाशितं में इतिहासाचे एक लक्षण सांगितलेले आहे. एरवीं नुसत्या राजकीय वृत्तान्ताने इतिहासाचे पुरते स्वरूप ध्यानीं येणार नाही. दुसरी व प्रस्तुत मुख्य गोष्ट ही सांगावयाची कीं, राजकीय इतिहासाचे एक अंग राज्यकारभार हे आहे व त्यासंबंधी माहिती घराण्याच्या इतिहासांतच मुख्यतः मिळावयाची. अशा दृष्टीने घराण्यांच्या इतिहासाची आवश्यकता व इष्टता आहे. प्रस्तुत पेंडसे घराण्याच्या ह्या पुस्तकांतहि दोन्ही तिन्ही अंगांची अशा दृष्टीने जा माहिती मिळते ती पाहूं-- कुलवृत्तान्त सन १९३८ साली प्रसिद्ध झाला; त्यानंतर दहा अकरा वर्षांनी हा वृत्तान्ताचा दुसरा खंड प्रसिद्ध होत आहे. गेल्या दहा वर्षांत घराण्यांमध्ये झालेल्या घडामोडी आणि त्या अवधींत घराण्यांसंबंधी मिळालेली माहिती व उपलब्ध झालेले ऐतिहासिक लेख यांत समाविष्ट करावयाचे आहेत. पहिल्या खंडांत आलेल्या वृत्तान्तापुढील म्हणजे कालदृष्ट्या पुढील माहिती या खंडांत समाविष्ट करावयाची हया अर्थाने हा पुरवणी ग्रंथ नाहीं. ऐतिहासिक मूळ साधने ज्यांत दाखल करावयाची आहेत त्या ग्रंथांचे बाबतींत पुरवणी म्हणजे पुढील पुढील तेवढीच माहिती देणे हा अर्थ नसतो. तर संशोधनाने नवीन उपलब्ध झालेली पत्रे इत्यादि मग ती पहिल्या ग्रंथांत आलेल्या पत्रादि ऐतिहासिक साधनाआधींची असली तरी