पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ].. वंशावळी व माहिती २०३ . भास्करभट पैसास-७६।३१ व ९१॥४९. : : . गोपाळ महादेव अर्ज सखाराम पणजे नारायण बंध बापुराव माता लक्ष्मी कुटुंब राधा भावजय रखमा. कासारवेली-परतवाडा. . . ." ओक-१४।३ बापूजी महादेव अ. सखाराम बंधु गोपाळ. एलिचपूर. नारायणाचा बाप लक्ष्मण ही माहिती वरील लेखांत नाहीं. तेव्हां नारायण बापूराव यांनी दिलेलें हें नांव खरे मानल्यास ऐ. क्र. २६ व २७ (खंड पहिला पृष्ठ ५०) मधील नारायणभट लक्ष्मण हे या घराण्यांतील असू शकतील. ते नारायणभट स. १८०४ मध्ये होते. महादेव सखाराम म्हणजे त्यांचा नातू याचा जन्म स. १८०८ मधील आहे. कालदृष्ट्या यांत विसंगति नाहीं. मिळालेले इनाम पा रायरी हुबळी येथे होते. घराणे ११ मधील बाळाजी लक्ष्मण हा हुबळी येथे फडणीस होता (ऐ. क्र. ५३ पहा). त्याचा हा नारायण लक्ष्मण भाऊ असण्याचा संभव दिसतो. या घराण्याचे कोंकणांतील मूळगांव कासारवेली होय. पुण्यास यांचे घर होते. ते ८० वर्षापूर्वी विकलें असे म्हणतात... कुलदेवता-जोगेश्वरी. हीस व सोमेश्वर, रवळनाथ, महालक्ष्मी व चेंडकाई यांस देवदिवाळी, गुडीपाडवा व दिवाळीचा पाडवा यांस नैवेद्य दाखवितात. धुळवडीस सोमेश्वर आणि रवळनाथ यांस नैवेद्य दाखवितात. नवरात्रांत व पौषांत एका, मंगळवारी जोगवा मागतात. आश्विनी नवरात्रांत पांच फुलांचा झेला असतो. एक दिवस सुवासिनीस भोजन देतात. महालक्ष्मीचे व्रत असते. बोडण व गोंधळ नाहीं. सोमेश्वर, महालक्ष्मी व चेंडकाई या देवतांस घराणे १८ गिम्हवणे येथील मंडळीही नैवेद्य दाखवितात. यावरून हें व १८ वे घराणे एक असण्याचा संभव आहे. लक्ष्मण (?) भार्या गंगा. सखाराम (२) पुण्यास राहात. भार्या रमा. कन्या (१) वेणू. (२) ठकू. (३) सोनू. महादेव सखाराम (३) मृ. स. १९००. ९२ व्या वर्षी. पुण्यास सदाशिव पेठेत यांचे स्वतःचे घर होते. सदाशिव पेठेतील हौदाची व्यवस्था ठेवण्याचे काम यांजकडे । होते. पगार अपुरा पडू लागल्यामुळे पुण्याहून व-हाडांत गेले. परतवाडा येथे सरकारी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक होते. शरीर भव्य असून देखणे होते. भार्या उमा, पि. काशीनाथ रामचंद्र. कन्या (१) वाराणसी, तिवरें येथे केळकरांकडे दिली. (२) गोदावरी (पार्वती), भ्र. सदाशिव शिवराम चिपळूणकर, पुणे. (३) चिमा. (४) दुर्गा, परतवाडा येथील दामले यांजकडे दिली. विष्णु महादेव (४) १८ व्या वर्षी मृत. अविवाहित. गोपाळ महादेव (४) ज. स. १८५२, मृ. स. १९०९ पुणे. परतवाड्यास स्टेशनरी दुकान होते. भार्या राधा (बहिणा), पि. विष्णुपंत गोडबोले, पुणे. कन्या (१) गंगू (अन्नपूर्णा), भ्र. विठ्ठल मोरेश्वर सोमण, नागपूर. (२) यमू, भ्र. भास्कर बळवंत मोने, उमरावती.