पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण नरसो आबाजी (५) पुंण्यास सदाशिव पेठेत बदामी हौदाजवळ राहात. सदाशिव आबाजी (५) नागपुरला कमिशनरचे ऑफिसांत कारकून होते. नारायण सदाशिव (६) मृ. स. १९४१ सप्टेंबर २२. ९२ वें वर्षी. रेल्वेत नोकर होते. वहुतेक. आयुष्य नागपुरला गेले. सेवानिवृत्त झाल्यावर नाशिकजवळ शरणपूर येथे राहात. यांनीं स. १८७८ त ख्रिस्ती धर्म स्वीकारला. नंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या मुलीशी लग्न झाले. भार्या यमुना, पि. काशीनाथ दामोदर जोशी, पुणे. * धैर्यशील नारायण (७) वय सुमारे ३८. सातारा येथे इन्कमटॅक्स ऑफिसमध्ये नोकरी होती. सध्या मुंबईस इन्कमटॅक्स तज्ज्ञ म्हणून काम करतात असे ऐकिंवांत आहे. भार्या मनोरमा, पि. ढालवाणी. * सत्वशील धैर्यशील (८) .... * चंद्रसेन नारायण (७) घराणे ३३ वें, कासारवेली खंड पहिला, पृष्ठ ३६७ संशोधन क्रमांक ११ मधील दिलेल्या वंशावळींतील माणसे परतवाडा येथे असल्याचे कळले. म्हणून संशोधन क्रमांक ११ रद्द करून येथे त्यांची उपलब्ध माहिती दिली आहे. १ नारायण नारायण बापूराव (५) यांनी पुढील वंशावळ सांगितली आहे. २ सखाराम लक्ष्मण नारायण ३ महादेव वासुदेव महादेव (विष्णु ४१ गोपाळ बापूराव रामचंद्र (श्रीकृष्ण) ५ नारायण भास्कर (बाळकृष्ण* । रामचंद्र* मधुकर श्रीपाद* वसंत* पुणे गोपाळ बापूराव । यांत महादेवाच्या पित्याचे नांव नारायण दिले आहे. परंतु ते चुकीच आहे. ते पित्याचे नसून आज्याचे आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोपाळ महादेव (४) हे शक १८११ मार्गशीर्ष शु. ८ स यात्रेस गेले होते; तेव्हां त्यांनी पुढील लेख लिहून दिला आहे. तसेच बापूजा महादेव यांनीहि आज्याचे नांव सखाराम सांगितले आहे. परतवाडा