पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* १९६ पेंडसे-कुल-वृत्तान्त । [प्रकरण - खंड पहिला, पृष्ठ ३४२ * नीळकंठ विनायक (५) किवळ्यास शेती व व्यापार करतात. पुण्यास बि-हाड आहे.—गृ. क्र. १९० कसबा पेठ. भार्या (१) पार्वती (काशी), ज. स. १९०४ पि. वासुदेव हरी लिमये. वि. स. १९१२. भार्या (२) सुशीला (मनी),वय २९. पि. दत्तोपंत फाटक, रावडी. सर्व संतति हिची. या दोन्ही भार्या विद्यमान आहेत. कन्या (२) मालती, वय ३. (३) शैलजा, वय १. * धनंजय नीळकंठ (६) ज. स. १९३९. मराठी शिकतो. * चंद्रकांत नीळकंठ (६) ज. स. १९४४. * गोपाळ विनायक (५) ज. श. १८२१ पौष शु. ३. पुण्यास रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी आहे. भार्या इंदिरा ऊर्फ सत्यभामा (कृष्णा), ज. श. १८३०. पि. गोपाळ विष्णु सुभेदार-जोशी, जमखंडी. कन्या (१) सुमन, मॅट्रिकचे वर्गात भ्र. बापू रामचंद्र परशुरामी, कोतूळ. * सुरेंद्र (नारायण) गोपाळ (६) एफ. वाय. सायन्सचे वर्गात. ** अजित गोपाळ (६) ज. स. १९४६ मे १. विष्णु गोविद (४) मृ. श. १८६१. भार्या लक्ष्मी (मथुरा), वय ६५. पि. धुंडीराज * वैद्य, करंजगांव. दिनकर गोविद (४) मृत्यु दहाव्या वर्षी. त्र्यंबक रामाजी (३) वैद्य दप्तरांत यांची पांच पत्रे उपलब्ध झाली आहेत. ती । श. १७२९ ते श. १७३४ मधील आहेत. हरभट त्र्यंबक (४) हे श. १७७८ मध्ये त्र्यंबकला यात्रेसाठी गेले होते. तेथे वास्तव्य गुहागर -किवळे-काशी असे सांगितले. हे काशीस राहात. भिकाजी आपाजी (२) श. १६७१ मध्ये हे पुण्यास होते. बापूजी महादेव हिंगण | यांचे पत्रावर यांनी साक्ष घातली आहे. बाळकृष्ण भिकाजी (३) हे श. १७६२ मध्ये काशीयात्रेस गेले होते. भार्या रखमा. दामोदर बाळकृष्ण (४) भार्या सावित्री. घराणे ३० वें, शहापूर-माहुली-चौक खंड पहिला, पृष्ठ ३४२ या घराण्यांत मूळ पुरुष बाळाजी (विश्वनाथ ) दाखविला होता. नाशिक येथ वे. वामनभट दाते यांजकडे खालील लेख उपलब्ध झाले त्यावरून बाळाजीच्या वडिलाचे नांव गोविंद असून त्यास कृष्ण व केशव असे दोन भाऊ व राधोपंत या नांवाचा पुत्र आणि जगन्नाथ या नांवाचा पुतण्या असल्याचे कळले. त्यावरून या घराण्याच्या वंशावळींत पुढीलप्रमाणे भर पडली :-