पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-----


६ वै] वंशावळी व माहिती १९५ तील जनार्दनाच्या वडिलांचे नांव बल्लाळ आहे व संशोधन क्रमांकांतील जनार्दनाच्या वडिलाचे नांव विष्णु आहे तेव्हां या व्यक्ति एकच असतील असे म्हणवत नाहीं. खंड पहिला पृष्ठ ३७० संशोधन क्र. २५ मध्ये सावित्रीबाईचा त्र्यंबकेश्वर येथे मिळालेला लेख दिला आहे. याच सावित्रीबाईचा लेख नाशिकास वे. दाते यांजकड़े पुढीलप्रमाणे आहे :-४२-१ सावित्री, भ्र. दामोदर बाळकृष्ण भिकाजी चुलत सासरे गोविंदराव यांचे पुत्र वामन व बळवंत. हे किवळे येथे राहातात. सासु रखमा वास्तव्य किवळे, वाई व गुहागर, काशी यथे वे. शा. सं. स. गोडबोले यांजकडे असलेला लेखः-बाळकृष्ण भिकाजी पुत्र ३ दामोदरभट वामनभट विष्णुभट चुलतबंधु त्र्यंबकभट भाऊ विश्वनाथपंत दाजी महादेव आबा सदाशिवपंत गोविंदपंत चुलत पुतणे हरी काशीस राहत होते. आषाढ शु. १० श. १७६२. वरील लेखांवरून सावित्रीबाई याच घराण्यांतील आहेत. वामनभट व विष्णुभट हे पुत्र नसून पुतणे होत. नाशिकचे बापूजी महादेव हिंगणे (मराठ्यांचे दिल्ली येथील वकील) यांनी बाबूराव दीक्षित पटवर्धन यांस शक १६७१ मार्गशीर्ष वद्य ३ या दिवशी कर्जपत्र लिहून दिले त्यावर भिकाजी अप्पाजी पेंडसे मुक्काम पुणे अशी गोही (साक्ष) आहे. (राजवाडे खंड ६ क्रमांक ४७१). हे भिकाजी अप्पाजी याच घराण्यातील असावे. वर दिलेले आपाजी बल्लाळचे उल्लेख शक १६८८ मधील आहेत. या दोन उल्लेखांत काळदृष्ट्या विसंगति दिसत नाही. म्हणजे आपाजीस दोन पुत्र रामाजी व भिकाजी असावेत. रामाजी आपाजी (जनार्दन) (२) वैद्य दप्तरांतून यांचीं तीन पत्रे उपलब्ध झाली आहेत. तीं श. १७३१ चे सुमाराची आहेत. सदाशिव रामाजी (३) रामाजो अप जी ने हिलेल्या कुंकुम पत्रिकेवरून यांचे लग्न मार्ग. श. १४ शक १७३१ (२० डिसें. १८०९) रोजी किवळे येथील मोरो हो बापट यांचे मुलीबरोबर झाले. आबाजी रामाजी (३) यांनी किवळयास विष्णूचे (रामाचे नव्हे) मंदिर बांधिलें. गोविद रामाजी (३) मृत्यु ७८ वे वर्षी. मिलिटरी खात्यांत नोकरी होती. सेवानिवृत्तीनंतर पुण्यास युरोपियन लोकांस देशी भाषा शिकवोत. शेवटी वास्तव्य किवळे. दुस-या भार्येचा पुत्र वामन. भार्या (३) सत्यभामा, पुण्याच्या बेलबागेच्या भानू घराण्यांतील. पुत्र विनायक, विष्णु व दिनकर, कन्या यमुना. वामन गोविद (४) कन्या बनू, भ्र. सखाराम सदाशिव मनोहर, बडोदें. विनायक गोविद (४) मृ. श. १८६०. भार्या राधा (वेणू), मृ. श. १८६७, वय ७६. पि. गणेश बाबाजी पाटणकर, खेड (पुणे).