पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ • पेंडसे कुलवृत्तान्त [प्रकरण त्या अर्जावर खालील सह्या आहेत :- १ रामभट अग्निहोत्री नातू मोरभट. २ नारायणभट अग्निहोत्री नातू भिकंभट. ३ वासुदेवभट अग्निहोत्री नातू हरभट. यांत आजा व नातू यांचे नांवाचा उल्लेख आहे; परंतु बापाचे नांवाचा उल्लेख नाहीं.. या इनामाबद्दल स. १८६४ मध्ये ज्या सनदा सरकारकडून मिळाल्या आहेत। त्यावरून त्या वेळी हे इनाम खालील नांवांवर चालू होते. (१) गोविंद मोरेश्वर, पेंडसे (२) दाजीभट भिकंभट पेंडसे (३) रखमाबाई, भ्र. बाळाजी विठ्ठल पेंडसे. यावरून मोरभटाचा पुत्र गोविंद व भिकंभटाचा पुत्र दाजीभट असल्याचे कळते. हरभटाचा बाळाजी विठ्ठल कोण हे येथे स्पष्ट नसले तरी पुढील माहितीवरून तो हरभटाचा नातू असल्याचे लक्षात येईल. वंशावळीच्या रूपांत ही माहिती पुढीलप्रमाणे : मांडतां येते. १ रामभट नारायणभट वासुदेवभंट शक १९९२ | | | मोरभट शक १७४९ • भिकभट | दाजी भट हरभट .. * विठ्ठल ४. गोविद । शक १७९६ बाळाजी = रखमा घराणे २५ मध्ये खंड पहिला पृष्ठ १४१ वर मोरेश्वर अथवा गोविंद मूळ पुरुष असावा असे लिहिले आहे. वर मिळालेल्या माहितींत गोविंद मोरेश्वर असे नांव आहे, म्हणजे गोविंद हा मोरेश्वराचा पुत्र आहे असे ठरते. या घराण्यांत एक इनाम असल्याची माहिती आहे. (पृष्ठ ३३२ पहा.) दाजी भिकाजी सदाशिव नारायण हे घराणे २६ मधील आहेत. व त्या घराण्यांत दुसरें इनाम चालत आहे. तिसरे उत्पन्न घराणे ४ मध्ये म्हणजे नवीन उपलब्ध झालेल्या माहितीप्रमाणे २६ मध्ये चालू होते. (खंड पहिला पृष्ठ १८१ पहा.) त्यावरून ते वासुदेवभट नातू हरभट यांचे वंशजाचे आहे. पहिल्या खंडाच्या पृष्ठ ८३ वर दिलेल्या वंशावळीला दुरुस्तीची आवश्यकता आहे. कारण पिढी ५ मधील रामचंद्र गणेश हे नाशिकास गेले असता: खालीलप्रमाणे लेख दिलेला आहे. यावरून पुढीलप्रमाणे वंशावळ होते. वे. वामनभट दात्ये ९६-रामचंद्र गणेश हरी बल्लाळ बंधु हरीपंत पुत्र कृष्ण वास्तव्य कोठिंबे-श्रीवर्धन. ।